Details
हवाई संरक्षणसिद्धतेत कोण किती तयार?
11-Sep-2019
”
विनय गजानन खरे..
भारतीय हवाई दलात अमेरिकन बोईंग बनावटीचे नि चौदा देशात वापरले जाणारे अपाचे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. त्याच्या २२ पैकी आठ ताफ्यात सामील करण्याचा कार्यक्रम हिंडन तळावर नुकताच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाला. यातील काही पंजाबजवळील भागात, पर्यायाने पाकिस्तान सीमेलगत तर काही चीन सीमेलगत तैनात होतील असं सांगितलं जातं. चिनूक, हीदेखील लवकरच अधिकच्या संख्येत येत आहेत. पाणबुडी खंदेरी या महिन्याअखेरीस दाखल होण्याची शक्यता व्यक्त होतेय. एकूणच गेल्या पाच वर्षांत झालेले अनेक करार पूर्ण होताहेत नि सामग्री हाती पडतेय. बहुचर्चित राफेल या महिनाअखेरीस दाखल होतेय. लढाऊ विमानांबाबत बोलायचे झाल्यास नव्याने तेजस या हलक्या लढाऊ विमानासाठी ‘हाल’शी मागणी नोंदकरार लवकरच होण्याची शक्यता असल्याची बातमी पुढे आलीय. या पार्श्वभूमीवर जगातील लढाऊ विमानांची माहिती घेऊ.
दुनियेतील टॉपच्या जेट्सची गोष्ट केली तर पहिल्या स्थानी अमेरिकेच्या एफ – २२ नाव घ्यावे लागेल. हे खूपच प्रगत अशा स्टील्थ तंत्राचे आहे. शत्रूच्या रडारला चकवा देऊन त्यात दिसणार नाही, असे हे तंत्र आहे. लॉक हिड मार्टिन कंपनीने अमेरिकन एअरफोर्ससाठी बनवले आहे. ते एक्स बँड रडारवर काम करते. या विमानाची स्वतःची रडार रेंज इतर सर्वांपेक्षा खूपच जास्त आहे. पूर्णतः संगणकीकृत अशा या जेटमध्ये दोन सुपर कम्प्युटर लावले असून सध्याच्या काळात सर्वश्रेष्ठ मानलं जातं.
रशियन बनावटीचे सुखोई टी – ५० हे एक वैमानिकाचे असून त्यात दोन इंजिन लावली आहेत. एनएपीओ कंपनीने रशियन एअरफोर्ससाठी ते बनवलं आहे. या जेटची गती सर्वोच्च पातळीवर २४४० किमी प्रति तास आहे. तर खालच्या पातळीवर म्हणजे १५२० किमी वर त्याचा पल्ला ३५०० किमी इतका आहे.
युरो फायटर टायफून दुनियेतील अनेक बेस्ट विमानांपैकी एक आहे. याची निर्मिती बीएइ सिस्टिम्स, एअरबस आणि इलेनिया अर्माची या तीन कंपन्यांनी मिळून केलीय. दोन इंजिने असलेल्या या विमानाचा उपयोग सध्या नाटो राष्ट्रे आणि सौदी अरेबिया एअरफोर्स करीत आहेत. ऑटो पायलट तंत्राने युक्त असून या विमानात ऑटो क्लाइम्ब नि ऑटो अटॅक सुविधादेखील आहे. वरिष्ठ पातळीवर याची गती २४९५ किमी प्रति तास तर खालच्या स्तरावर १५५० किमी प्रति तास आहे. त्याचा पल्ला २९०० किमी इतका आहे.
एसयू – ३५ हे रशियन एसयू – २७ याच्यापुढील प्रगत जेट विमान आहे. एक चालक नि दोन इंजिन सुविधा असलेले हल्लेखोर विमान आहे. याला दुश्मन आपल्या रडारमध्ये सहजगत्या पकडू शकत नाही. वरिष्ठ पातळीवर याची गती २३९० किमी प्रति तास तर निम्न स्तरावर १४९० किमी आहे. दसॉल्ट एव्हिएशननिर्मित राफेल हे अतिप्रगत रडार मागोवा तंत्राने नि इलेक्ट्रॉनिक युद्धक्षमतेने संपन्न आहे. त्याचबरोबर अणूशस्त्र टाकण्याची संहारक क्षमता आहे. भारतीय हवाई दलाने त्याचसाठी याची निवड केली आहे. जवळपास चाळीस वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या मिगच्या जागी याची तैनाती होईल. याची उच्चतम गती वरील स्तरावर १९१२ किमी प्रति तास आणि खालच्या स्तरावर १३९० किमी आहे. वरच्या स्तरावर ३७०० किमी पल्ला आहे.
दुनियेतील अत्यंत गतिमान, वेगवान हेलिकॉप्टरच्या नावात युरोकॉप्टर एक्स थ्रीचा समावेश होतो. एअरबस हेलिकॉप्टर नावाच्या कंपनीने याची निर्मिती केली आहे. त्याचा अधिकतम वेग ४७२ किमी प्रति तास इतका आहे. दुसऱ्या स्थानी आपण अलिकडेच ताफ्यात सहभागी करून घेतलेले सीएच ३ चिनूक आहे. त्याचा ताशी वेग ३१५ किमी आहे. दोन इंजिन नि रोटर लिफ्ट ही खासियत असल्याने समतोल साधला जाऊन चांगला वेग मिळतो असं तज्ञांना वाटतं. एमआय ३५ एम हे रशियन बनावटीचे नि तिसऱ्या स्थानी असलेले हेलिकॉप्टर आहे. त्याची निर्मिती मास्को हेलिकॉप्टर प्लँटमध्ये होते. यातील काही आपल्याकडे आहेत. याची गतिमानता ताशी ३१० किमी आहे.
इटलीची ऑगस्ता वेस्टलँड घोटाळ्यामुळे ही कंपनी आपल्या यादीतून बाद झाली असली तरी तिने ब्रिटनच्या जेकेएन कंपनीच्या सहकार्याने ३०९ किमी वेगाचे मर्लिन एएच १०१ हेलिकॉप्टर निर्माण केले आहे. दोन इंजिन नि पंधरा जण बसतील असं ऑगस्ता वेस्टलँड एडब्ल्यू जगातील पाचवे वेगवान हेलिकॉप्टर मानले जाते. याचा कमाल वेग ताशी ३०६ किमी इतका आहे. याची सर्वात जास्त गती ३०६ किमी प्रती तास अशी आहे.
दरम्यान,बाहेरील देशाकडून होत असलेली शस्त्रखरेदी पाहून घरच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.कडून नव्या तेजसच्या निर्मितीसाठी हिरवा कंदील कधी मिळतोय, याची वाट बघणे चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाकडून तब्बल वीस हजार कोटी रूपयांची थकीत रक्कम कधी मिळणार याची कंपनी वाट पाहतेय. इंग्रजी दैनिक द हिंदूने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. या विमान सौद्याची किंमत ५९ हजार कोटी रूपये आहे. ‘हाल’कडून हलकी लढाऊ ८३ तेजस विमानं घेण्याचा करार कधी होणार याचा अंदाज सांगता येत नाही असं सूत्रांनी सांगितलं. डिसेंबर अखेरपर्यंत तो होऊ शकतो असं बोललं जातंय. आतापर्यंत कंपनीने वीस तेजस विमानं दिली गेली आहेत. हालचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांच्यानुसार बेंगळुरूत १६ विमानं बनवण्याची क्षमता आहे. कंपनीला या अधिकच्या विमानांचा पुरवठा आदेश मिळायला हवा. त्याची वाट पाहतोय, असे ते म्हणाले. सध्या कंपनीने कर्मचारी पगार नि इतर खर्च भागविण्यासाठी हजार कोटी रूपयांची उसनवारी केली आहे. थकीत रक्कम मिळाल्यास नव्या विमानांच्या कामासाठी साहित्य घेणे नि रेखांकन काम सुरू करता येईल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, नुकत्याच दिल्लीत झालेल्या एका परिसंवादात संरक्षण मंत्रालयाचे महानिर्देशक अपूर्व चंद्र यांनी तेजससाठी ऑर्डर दिली जाणार आहे. किमतीबाबत चर्चा पूर्ण झाली असून काही दिवसात करार होईल, असे सांगितले. एका आंतरराष्ट्रीय संमेलनात भाग घेतल्यावर ते बोलत होते. पॅकेज किंमत निश्चित झाल्यावर करार होईल. इंडिया हॅबिटाट सेंटर येथे ‘एनर्जिंग इंडियन एरोस्पेस इंडस्ट्री : फ्लाईट प्लॅन फॉर द फ्युचर’ या विषयावर परिसंवाद होता. मात्र, आता एकच प्रश्न उरतो की, तेजस बनविणाऱ्या कंपनीची थकबाकी असल्यास संरक्षण मंत्रालय कधी देणार, पुढील विमानं किती काळात मिळणार, त्याचा वापर कसा होणार, निर्णयाची झपाट्याने अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. अलीकडच्या काळात आर्थिक मंदीचे सावट वाढत असताना संरक्षण सिद्धतेवर याचा काय परिणाम होईल, याविषयी तज्ज्ञांची मतमतांतरे आहेत.”
विनय गजानन खरे..
“भारतीय हवाई दलात अमेरिकन बोईंग बनावटीचे नि चौदा देशात वापरले जाणारे अपाचे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. त्याच्या २२ पैकी आठ ताफ्यात सामील करण्याचा कार्यक्रम हिंडन तळावर नुकताच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाला. यातील काही पंजाबजवळील भागात, पर्यायाने पाकिस्तान सीमेलगत तर काही चीन सीमेलगत तैनात होतील असं सांगितलं जातं. चिनूक, हीदेखील लवकरच अधिकच्या संख्येत येत आहेत. पाणबुडी खंदेरी या महिन्याअखेरीस दाखल होण्याची शक्यता व्यक्त होतेय. एकूणच गेल्या पाच वर्षांत झालेले अनेक करार पूर्ण होताहेत नि सामग्री हाती पडतेय. बहुचर्चित राफेल या महिनाअखेरीस दाखल होतेय. लढाऊ विमानांबाबत बोलायचे झाल्यास नव्याने तेजस या हलक्या लढाऊ विमानासाठी ‘हाल’शी मागणी नोंदकरार लवकरच होण्याची शक्यता असल्याची बातमी पुढे आलीय. या पार्श्वभूमीवर जगातील लढाऊ विमानांची माहिती घेऊ.”
“दुनियेतील टॉपच्या जेट्सची गोष्ट केली तर पहिल्या स्थानी अमेरिकेच्या एफ – २२ नाव घ्यावे लागेल. हे खूपच प्रगत अशा स्टील्थ तंत्राचे आहे. शत्रूच्या रडारला चकवा देऊन त्यात दिसणार नाही, असे हे तंत्र आहे. लॉक हिड मार्टिन कंपनीने अमेरिकन एअरफोर्ससाठी बनवले आहे. ते एक्स बँड रडारवर काम करते. या विमानाची स्वतःची रडार रेंज इतर सर्वांपेक्षा खूपच जास्त आहे. पूर्णतः संगणकीकृत अशा या जेटमध्ये दोन सुपर कम्प्युटर लावले असून सध्याच्या काळात सर्वश्रेष्ठ मानलं जातं.”
रशियन बनावटीचे सुखोई टी – ५० हे एक वैमानिकाचे असून त्यात दोन इंजिन लावली आहेत. एनएपीओ कंपनीने रशियन एअरफोर्ससाठी ते बनवलं आहे. या जेटची गती सर्वोच्च पातळीवर २४४० किमी प्रति तास आहे. तर खालच्या पातळीवर म्हणजे १५२० किमी वर त्याचा पल्ला ३५०० किमी इतका आहे.
“युरो फायटर टायफून दुनियेतील अनेक बेस्ट विमानांपैकी एक आहे. याची निर्मिती बीएइ सिस्टिम्स, एअरबस आणि इलेनिया अर्माची या तीन कंपन्यांनी मिळून केलीय. दोन इंजिने असलेल्या या विमानाचा उपयोग सध्या नाटो राष्ट्रे आणि सौदी अरेबिया एअरफोर्स करीत आहेत. ऑटो पायलट तंत्राने युक्त असून या विमानात ऑटो क्लाइम्ब नि ऑटो अटॅक सुविधादेखील आहे. वरिष्ठ पातळीवर याची गती २४९५ किमी प्रति तास तर खालच्या स्तरावर १५५० किमी प्रति तास आहे. त्याचा पल्ला २९०० किमी इतका आहे.”
एसयू – ३५ हे रशियन एसयू – २७ याच्यापुढील प्रगत जेट विमान आहे. एक चालक नि दोन इंजिन सुविधा असलेले हल्लेखोर विमान आहे. याला दुश्मन आपल्या रडारमध्ये सहजगत्या पकडू शकत नाही. वरिष्ठ पातळीवर याची गती २३९० किमी प्रति तास तर निम्न स्तरावर १४९० किमी आहे. दसॉल्ट एव्हिएशननिर्मित राफेल हे अतिप्रगत रडार मागोवा तंत्राने नि इलेक्ट्रॉनिक युद्धक्षमतेने संपन्न आहे. त्याचबरोबर अणूशस्त्र टाकण्याची संहारक क्षमता आहे. भारतीय हवाई दलाने त्याचसाठी याची निवड केली आहे. जवळपास चाळीस वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या मिगच्या जागी याची तैनाती होईल. याची उच्चतम गती वरील स्तरावर १९१२ किमी प्रति तास आणि खालच्या स्तरावर १३९० किमी आहे. वरच्या स्तरावर ३७०० किमी पल्ला आहे.
“दुनियेतील अत्यंत गतिमान, वेगवान हेलिकॉप्टरच्या नावात युरोकॉप्टर एक्स थ्रीचा समावेश होतो. एअरबस हेलिकॉप्टर नावाच्या कंपनीने याची निर्मिती केली आहे. त्याचा अधिकतम वेग ४७२ किमी प्रति तास इतका आहे. दुसऱ्या स्थानी आपण अलिकडेच ताफ्यात सहभागी करून घेतलेले सीएच ३ चिनूक आहे. त्याचा ताशी वेग ३१५ किमी आहे. दोन इंजिन नि रोटर लिफ्ट ही खासियत असल्याने समतोल साधला जाऊन चांगला वेग मिळतो असं तज्ञांना वाटतं. एमआय ३५ एम हे रशियन बनावटीचे नि तिसऱ्या स्थानी असलेले हेलिकॉप्टर आहे. त्याची निर्मिती मास्को हेलिकॉप्टर प्लँटमध्ये होते. यातील काही आपल्याकडे आहेत. याची गतिमानता ताशी ३१० किमी आहे.”
इटलीची ऑगस्ता वेस्टलँड घोटाळ्यामुळे ही कंपनी आपल्या यादीतून बाद झाली असली तरी तिने ब्रिटनच्या जेकेएन कंपनीच्या सहकार्याने ३०९ किमी वेगाचे मर्लिन एएच १०१ हेलिकॉप्टर निर्माण केले आहे. दोन इंजिन नि पंधरा जण बसतील असं ऑगस्ता वेस्टलँड एडब्ल्यू जगातील पाचवे वेगवान हेलिकॉप्टर मानले जाते. याचा कमाल वेग ताशी ३०६ किमी इतका आहे. याची सर्वात जास्त गती ३०६ किमी प्रती तास अशी आहे.
“दरम्यान,बाहेरील देशाकडून होत असलेली शस्त्रखरेदी पाहून घरच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.कडून नव्या तेजसच्या निर्मितीसाठी हिरवा कंदील कधी मिळतोय, याची वाट बघणे चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाकडून तब्बल वीस हजार कोटी रूपयांची थकीत रक्कम कधी मिळणार याची कंपनी वाट पाहतेय. इंग्रजी दैनिक द हिंदूने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. या विमान सौद्याची किंमत ५९ हजार कोटी रूपये आहे. ‘हाल’कडून हलकी लढाऊ ८३ तेजस विमानं घेण्याचा करार कधी होणार याचा अंदाज सांगता येत नाही असं सूत्रांनी सांगितलं. डिसेंबर अखेरपर्यंत तो होऊ शकतो असं बोललं जातंय. आतापर्यंत कंपनीने वीस तेजस विमानं दिली गेली आहेत. हालचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांच्यानुसार बेंगळुरूत १६ विमानं बनवण्याची क्षमता आहे. कंपनीला या अधिकच्या विमानांचा पुरवठा आदेश मिळायला हवा. त्याची वाट पाहतोय, असे ते म्हणाले. सध्या कंपनीने कर्मचारी पगार नि इतर खर्च भागविण्यासाठी हजार कोटी रूपयांची उसनवारी केली आहे. थकीत रक्कम मिळाल्यास नव्या विमानांच्या कामासाठी साहित्य घेणे नि रेखांकन काम सुरू करता येईल, असंही ते म्हणाले.”
“दरम्यान, नुकत्याच दिल्लीत झालेल्या एका परिसंवादात संरक्षण मंत्रालयाचे महानिर्देशक अपूर्व चंद्र यांनी तेजससाठी ऑर्डर दिली जाणार आहे. किमतीबाबत चर्चा पूर्ण झाली असून काही दिवसात करार होईल, असे सांगितले. एका आंतरराष्ट्रीय संमेलनात भाग घेतल्यावर ते बोलत होते. पॅकेज किंमत निश्चित झाल्यावर करार होईल. इंडिया हॅबिटाट सेंटर येथे ‘एनर्जिंग इंडियन एरोस्पेस इंडस्ट्री : फ्लाईट प्लॅन फॉर द फ्युचर’ या विषयावर परिसंवाद होता. मात्र, आता एकच प्रश्न उरतो की, तेजस बनविणाऱ्या कंपनीची थकबाकी असल्यास संरक्षण मंत्रालय कधी देणार, पुढील विमानं किती काळात मिळणार, त्याचा वापर कसा होणार, निर्णयाची झपाट्याने अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. अलीकडच्या काळात आर्थिक मंदीचे सावट वाढत असताना संरक्षण सिद्धतेवर याचा काय परिणाम होईल, याविषयी तज्ज्ञांची मतमतांतरे आहेत.”

