Friday, October 18, 2024
HomeArchiveपुरूषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण...

पुरूषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढतंय..

Details
पुरूषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढतंय..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
वंध्यत्वाचा दोष स्त्रियांमध्ये असण्याचे प्रमाण ४० टक्के असले तरी पुरूषांमध्ये वंध्यत्वाचा दोष असण्याचे प्रमाण वाढत आहे व जवळपास ३०-४० टक्के जोडप्यांच्या बाबतीत पुरूषांमध्ये दोष असतो अशी माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आलेली आहे.

नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्सचे सीईओ संतोष मराठे यांनी सांगितले की, “नवी मुंबईत अपोलो फर्टिलिटी सेंटर सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. यामुळे आता कितीतरी जोडप्यांना पालकत्वाचा आनंद अनुभवता येईल. अपोलो फर्टिलिटी सेंटरमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधा व अनुभवी क्लिनिशियन्सची विशेष टीम उपलब्ध असल्याने अतिशय दर्जेदार उपचारप्रक्रिया रूग्णाची नीट काळजी घेऊन केल्या जातात. अपोलो फर्टिलिटीमध्ये अपोलोच्या अतिशय नावाजल्या जाणाऱ्या सेवा, सर्वोत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचे लाभ रूग्णांना मिळतात.”
अपोलो फर्टिलिटीच्या चीफ कन्सल्टन्ट डॉ. निकिता लाड पटेल यांनी सांगितले की, “वंध्यत्वामुळे त्रस्त असलेल्या रूग्णांना नवी मुंबईतील नवीन अपोलो फर्टिलिटी सेंटरमध्ये पुरावे व शिष्टाचारांवर आधारित, नैतिक, पारदर्शक उपचार पर्याय उपलब्ध करवून देण्यात येतील. अपोलोमध्ये आम्ही क्लिनिकल शिष्टाचार व नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. आमच्याकडील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रूग्णाला यशस्वी परिणाम अनुभवता येतात.”

सहज उपलब्ध होऊ शकेल अशी काळजी व सेवा यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अपोलो फर्टिलिटी सेंटरमधील फर्टिलिटी तज्ञांची टीम जोडप्याच्या विशिष्ट गरजा, त्यांची परिस्थिती यानुसार सुनियोजित उपचार प्रदान करते. उपचार घेण्यापूर्वी जोडप्यांच्या मनात विश्वास निर्माण होणे, त्यांच्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताण नसणे गरजेचे असते. तसेच त्यांच्यासोबत जवळचे संबंध निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. त्याला वेळ द्यावा लागतो. त्यांची समस्या नीट समजून घ्यावी लागते आणि त्यानंतरच योग्य उपचार ठरवता येतात हे त्याठिकाणच्या तज्ञांना समजते.

अपोलो क्रेडल अँड फर्टिलिटीचे सीईओ अनुभव प्रशांत यांनी सांगितले, “आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की, अपोलोच्या समृद्ध परंपरेचा वारसा सोबत असलेले अपोलो फर्टिलिटी हे वंध्यत्व उपचार क्षेत्रातील भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठित व नावाजले जाणारे सेंटर आहे आणि आम्ही या सेंटरच्या सुरूवातीच्या काळातच १८००० हून जास्त जोडप्यांवर उपचार केले आहेत. नवी मुंबईतील अपोलो फर्टिलिटी हे भारतातील आमचे सातवे सेंटर आहे आणि आम्हाला आशा आहे की, नवी मुंबई व आजूबाजूच्या भागातील जोडप्यांना याचा लाभ मिळेल. येत्या काळात आम्ही इतर शहरातही आमची सेंटर्स सुरू करणार आहोत.”

अपोलो फर्टिलिटीच्या चीफ कन्सल्टन्ट डॉ. नीलम भिसे यांनी, फर्टिलिटी सेंटरमध्ये जाण्याचा निर्णय वेळीच घेतला जाणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. त्या म्हणाल्या की, “कितीतरी जोडपी उपचारांची सुरूवात खूप उशिरा करतात. ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्या जोडप्यांना अनेक वर्षे प्रयत्न करूनही मूल होत नसेल त्यांनी असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह तंत्रज्ञानाची मदत घेणे गरजेचे असते. उपचार यशस्वी होण्यासाठी ते लवकरात लवकर घेतले जाणे गरजेचे असते.”

वंध्यत्वाचा दोष स्त्रियांमध्ये असण्याचे प्रमाण ४०% असले तरी पुरूषांमध्ये वंध्यत्वाचा दोष असण्याचे प्रमाण वाढत आहे व जवळपास ३०-४०% जोडप्यांच्या बाबतीत पुरूषांमध्ये दोष असतो. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. भिसे म्हणाल्या की, “इन्फर्टिलिटी क्लिनिक्स ही फक्त स्त्रियांसाठी असतात हा भारतीय समाजातील सार्वत्रिक गैरसमज आहे. पुरूषांमध्येही वंध्यत्वाचा दोष असू शकतो या महत्त्वाच्या बाबीकडे सहजपणे दुर्लक्ष केले जाते. भारतात जवळपास ५०% वंध्यत्व पुरूषांच्या शरीरातील काही दोषांमुळे निर्माण झालेले असते. त्यामुळे जेव्हा एखादे जोडपे उपचारांसाठी येते तेव्हा पुरूषाचीदेखील संपूर्ण तपासणी करणे आवश्यक असते.”

अपोलो फर्टिलिटीमध्ये उपचार व रूग्णाची काळजी घेण्याच्या बाबतीत सर्वसमावेश दृष्टिकोन अवलंबिला जातो. पहिल्या भेटीत जेव्हा रूग्णाची संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेतली जाते. तेव्हा नवरा-बायको दोघांनी येणे अपेक्षित असते. आधीचे रिपोर्ट्स तपासले जातात. वैद्यकीय पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी काही साध्या तपासण्या करण्यासाठी सुचवले जाते. जोडप्याची विशिष्ट स्थिती, त्यांच्या गरजा यानुसार उपचारांचे नियोजन केले जाते.

अपोलो फर्टिलिटीचे नॅशनल सायन्टिफिक हेड डॉ. सुवर्चला यांनी सांगितले की, “आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की, आमच्या अत्याधुनिक आयव्हीएफ लॅबची गुणवत्ता अतुलनीय आहे. उपचारांच्या दृष्टीने हे खूपच महत्त्वाचे असते. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन सुव्यवस्थित असलेल्या भारतातील अगदी मोजक्या लॅब्सपैकी एक आमची लॅब आहे ज्यामध्ये असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह तंत्रज्ञानाचे जास्तीतजास्त लाभ मिळतात.””
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...
Skip to content