HomeArchiveमहाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये...

महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये वैद्यकीय चिकित्सा शिबीर

Details
महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये वैद्यकीय चिकित्सा शिबीर

    26-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई आणि श्री शिवनाथ शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मिलिटरी स्कूल या टोकावडे (मुरबाड, ठाणे) येथील सैनिकी शाळेत वैद्यकीय चिकित्सा शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
 
 
यात २५० विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा, त्वचापरीक्षा तसेच अन्य आरोग्यविषयक बाबींची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे शैक्षणिक विभागाच्या वतीने गणित, त्यातील गंमती, वैयक्तिक विकास, इंग्रजी संभाषण कला, सोशल मीडियाचे फायदे व तोटे या विषयावरदेखील मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी घेण्यात आली तसेच प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमामपत्र देऊन गौरविण्यात आले.
 
 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य काशिनाथ भोईर, सुहास नार्वेकर, प्रकाश करमरकर यांनी परिश्रम घेतले. वैद्यकीय शिबिरात डॉ. प्रशांत पवार, डॉ. पल्लवी सावंत, डॉ. धनंजय कुलकर्णी, डॉ. प्रसाद खुटाडे तसेच चैतन्य गोरे, शशिकांत मडकईकर यांनी याकामी सहकार्य केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, राजेंद्र वराडकर, संजय चेंदवणकर, सुप्रिया राणे-पवार, जयश्री करमरकर, डॉ. प्रसाद खुटाडे, डॉ. प्रशांत पवार, जुगल कुमार, अवधूत आकलेकर यांचे विशेष सहकार्य मिळाले. यानंतर विद्यार्थ्यांनी नयनरम्य कवायत सादर केली तसेच रॉक क्लांयबिंगचे प्रात्याक्षिकदेखील सादर केले.
 

 
 

 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई आणि श्री शिवनाथ शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मिलिटरी स्कूल या टोकावडे (मुरबाड, ठाणे) येथील सैनिकी शाळेत वैद्यकीय चिकित्सा शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.”
 
 
“यात २५० विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा, त्वचापरीक्षा तसेच अन्य आरोग्यविषयक बाबींची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे शैक्षणिक विभागाच्या वतीने गणित, त्यातील गंमती, वैयक्तिक विकास, इंग्रजी संभाषण कला, सोशल मीडियाचे फायदे व तोटे या विषयावरदेखील मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी घेण्यात आली तसेच प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमामपत्र देऊन गौरविण्यात आले.”
 
 
“हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य काशिनाथ भोईर, सुहास नार्वेकर, प्रकाश करमरकर यांनी परिश्रम घेतले. वैद्यकीय शिबिरात डॉ. प्रशांत पवार, डॉ. पल्लवी सावंत, डॉ. धनंजय कुलकर्णी, डॉ. प्रसाद खुटाडे तसेच चैतन्य गोरे, शशिकांत मडकईकर यांनी याकामी सहकार्य केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, राजेंद्र वराडकर, संजय चेंदवणकर, सुप्रिया राणे-पवार, जयश्री करमरकर, डॉ. प्रसाद खुटाडे, डॉ. प्रशांत पवार, जुगल कुमार, अवधूत आकलेकर यांचे विशेष सहकार्य मिळाले. यानंतर विद्यार्थ्यांनी नयनरम्य कवायत सादर केली तसेच रॉक क्लांयबिंगचे प्रात्याक्षिकदेखील सादर केले.”

 

 
 

 
 
महाराष्ट्र मिलिटरी स्कूलसैनिकी शाळावैद्यकीय चिकित्सा शिबिररॉक क्लांयबिंगबौद्धिक चाचणी

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content