HomeArchive'डेमोक्रॅसी अँड मी'...

‘डेमोक्रॅसी अँड मी’ – खासदार राहुल शेवाळे यांचा नवा उपक्रम!

Details
‘डेमोक्रॅसी अँड मी’ – खासदार राहुल शेवाळे यांचा नवा उपक्रम!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

भारतीय लोकशाहीबद्दल तरूण पिढीची नेमकी काय मतं आहेत, हे जाणून घेण्यासाठी दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी ‘डेमोक्रॅसी अँड मी’ या विषयावरच्या एका स्पर्धेचं आयोजन केले आहे. यातील 25 विजेत्यांना प्रजासत्ताक दिनी राजपथावरील परेड, संसद भवन आणि राष्ट्रपती भवनाला भेट देण्याची संधी मिळणार आहे.
जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळख असणाऱ्या भारतीय लोकशाहीचे भवितव्य आजच्या तरूणाईच्या हातात आहे. त्यामुळे लोकशाही या विषयावर व्यक्त होऊ इच्छिणाऱ्या तरूण-तरूणींसाठी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी ‘डेमोक्रॅसी अँड मी’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. दक्षिण-मध्य मुंबईतील महाविद्यालयांमध्ये येत्या 10 जानेवारीला होणाऱ्या या स्पर्धेची घोषणा शेवाळे यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली.

18 ते 25 वर्षे वयोगटासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत, 600 ते 1000 शब्दांत स्पर्धकांनी आपली मते मांडायची आहेत. एकूण 26 उत्कृष्ट लेखकांना दिल्लीच्या राजपथावर, प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. शिवाय संसद भवन आणि राष्ट्रपती भवनालाही भेट देता येणार आहे. पहिल्या पाच विजेत्यांना आकर्षक बक्षीस आणि सर्व स्पर्धकांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. मात्र, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाकडे मतदार ओळखपत्र असणे गरजेचे आहे. जानेवारी महिन्यात येणारा राष्ट्रीय युवा दिन, राष्ट्रीय मतदाता दिन आणि प्रजासत्ताक दिन याचे औचित्य साधून युवकांना देशप्रेम आणि लोकशाही याबाबत नव्याने जागृत करण्यासाठी ‘डेमोक्रॅसी अँड मी’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीतजास्त युवकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन शेवाळे यांनी केले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

रोहिणी हट्टंगडी यांना भारताबाहेरचा पहिला पुरस्कार!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६ची सुरुवात हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. कॅमेऱ्यांच्या लखलखत्या फ्लॅशमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या शानदार आगमनाने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले. या सोहळ्यात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी...

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...
Skip to content