HomeArchiveगृहनिर्माण संस्थांच्या आयकरातल्या...

गृहनिर्माण संस्थांच्या आयकरातल्या सवलतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करू – खा. किरीट सोमय्या

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
“सहकारी गृहनिर्माण संस्थांना इन्कम टॅक्स परतावा मिळावा, सोसायट्यांना करमुक्त करावे, यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे पाठपुरावा करू. तसेच हा विषय संसदेतसुद्धा मांडला जाईल,” अशी ग्वाही खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईत मुलुंड येथे दिली.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक आणि मुंबई हौसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हौसिंग सोसायट्यांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमास मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, आमदार प्रसाद लाड, आमदार सरदार तारासिंह, माजी आमदार चरणसिंह सप्रा, फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, ज्येष्ठ संचालक सिध्दार्थ कांबळे, बी. डी. पारले, जिजाबा पवार, जयश्री पांचाळ, कविता देशमुख, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेवक प्रभाकर शिंदे, नील सोमय्या, रवींद्र पवार, चंद्रशेखर प्रभू, स्थानिक नगरसेविका रजनी केणी, अनिशा माजगावकर उपस्थित होते. यावेळी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकारी चळवळीच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांना इन्कम टॅक्समुक्त करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे खासदार सोमय्या यांनी सांगितले. गृहनिर्माण संस्थांना सुविधा देण्यासाठी फेडरेशनचे उपकेंद्र पूर्व उपनगरात उभारण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणाही खासदार सोमय्या यांनी केली.

दरम्यान, स्वयं पुनर्विकास योजनेसाठी शासनाने वन विंडो सिस्टीम सुरू करावी, अशी मागणी संस्थांनी केली. त्यावर बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, “मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुंबई बँकेने स्वयं पुनर्विकास अभियान सुरू केले. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाठबळामुळे ही योजना आता एक गतिमान लोकचळवळ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी धोरण बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वन विंडोला तयारीही दाखवली आहे. याकामी मुंबई बँक व हौसिंग फेडरेशन पाठपुरावा करीत आहे. या योजनेत शेकडो सोसायट्या सहभागी होत आहेत. या योजनेसाठी आवश्यक तेवढा निधी आम्ही कॉन्सॉरटियमच्या माध्यमातून उभारू. पण निधी कमी पडू दिला जाणार नाही.’

स्वयं पुनर्विकास करणाऱ्या संस्थांना आतापर्यंत 85 % कर्ज पुरवठा करण्याचे धोरण होते. पण यापुढे प्रकल्पाच्या 95 % पर्यंत कर्जपुरवठा केला जाईल, अशी घोषणाही आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली.

हौसिंग फेडरेशनची पूर्व व पश्चिम उपनगरात तीन उपकेंद्रे लवकरात लवकर सुरू करू. त्यासाठी मुंबई बँक सहकार्य करील, असे प्रतिपादन शिवाजीराव नलावडे यांनी केले तर मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी हौसिंग फेडरेशन कटिबद्ध असल्याचे प्रकाश दरेकर यांनी सांगितले. यावेळी चंद्रशेखर प्रभू, उपनिबंधक आर. एस. खंडाईत, म्हाडाचे कार्यकारी अभियंता दिलीप गरजे, डी. एस. वडेर, प्रणय गोयल यांनी विविध विषयांवर मार्गदशन केले. प्रास्ताविक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. डी. एन. महाजन यांनी केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....
Skip to content