HomeArchiveपोषण आहाराची प्रलंबित...

पोषण आहाराची प्रलंबित बिले मिळावीत – प्रवीण दरेकर

Details
पोषण आहाराची प्रलंबित बिले मिळावीत – प्रवीण दरेकर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या संस्थांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचा तांदूळ मिळालेला नाही. तसेच २०११ पासून आतापर्यंत अनेक संस्थांची बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे आहार पुरवठा करताना महिला संस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रलंबित बिले तातडीने मिळावीत, तांदूळ मिळावा, अशा मागणीचे निवेदन आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना नुकतेच दिले आहे.

मुंबई व कोकण विभागीय महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था महासंघाच्या अध्यक्षा जयश्री पांचाळ यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे. आहार पुरविणाऱ्या महिला संस्था, महिला मंडळ, स्वयंसहायता बचतगट यांच्या समोरील अडचणीबाबत जयश्री पांचाळ यांनी महापालिकेचे शालेय पोषण आहारचे शिक्षण अधीकारी तसेच मंत्रालय पातळीवर पाठपुरवा केला. पण अद्याप त्यावर कार्यवाही झली नसल्याने आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यात संयुक्त बैठक घेऊन शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या महिला संस्था आणि बचत गटांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे कि, ‘मुंबईतील २५१ महिला संस्थांद्वारे २२०० शाळांना शालेय पोषण आहार पुरविण्यात येतो. पण महापालिका क्षेत्रातील शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या संस्थांना अनुदान मिळालेले नाही. आतापर्यंत बिलाची रक्कम संस्थांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना देऊनही ती जमा होत नाहीत तर संबंधित शाळांच्या खात्यावर जमा होत आहेत. त्यामुळे अनुदान प्रलंबित असून पोषण आहाराच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तथापि, अन्य जिल्ह्यांप्रमाणे बिलांची रक्कम तातडीने संस्थांच्या खात्यावरच जमा करण्यात यावी, अशी माहिती जयश्री पांचाळ यांनी दिली.

स्वयंपाकी आणि मदतनीस यांचे प्रलंबित अनुदान हे संस्थानिहाय आणि विद्यार्थी पटसंख्येनुसार करण्यात यावे. एमडीएम पोर्टलवर विद्यार्थी पटनोंदणीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे दिलेल्या कालावधीत झालेली नाही. त्याच्या पुनर्भरणीसाठी कालावधी वाढवून मिळावा. काही संस्थांची बिले २००७-०८ पासून ते २०१५-१६ पर्यंत प्रलंबित आहेत. अजून मिळालेली नाहीत. हमीपत्र, अधिदान, देयकांवरील त्रुटी यांसारख्या कारणांमुळे बिले प्रलंबित आहेत. त्यामुळे संस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. म्हणून बचतगट, महिला संस्थांची जुनी बिले तातडीने अदा करावीत. तसेच गॅस सबसिडीची अनेक संस्थांची बिले अनेक वर्षांपासून थकीत आहेत. अशा संस्थांनासुद्धा देय असलेली बिले मिळावीत. तसेच सर्व संस्थांची विद्यार्थ्यांच्या उपस्थितीप्रमाणे बिले अदा करावीत, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...

इराणवर हल्ला करण्यास अमेरिकी सेनेटची मनाई!

गेल्या जवळपास चार महिन्यांपासून पश्चिम आशियाला अशांतेच्या गर्तेत लोटणाऱ्या अमेरिका-इराण संघर्षात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. १७ जून रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानंतर या दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबले असले, तरी आता दोन्ही देशांमध्ये अटी आणि नियमांवरून पुन्हा एकदा...

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...
Skip to content