Details
टेट्रापॉड म्हणजे सुशोभिकरण नव्हे – राहुल शेवाळे!
01-Jul-2019
”
नितीन सरदेसाईंवर केला पलटवार
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दादर-माहीम चौपाटीचे सुशोभिकरण करण्याच्या कामाचे भूमीपूजन बुधवारी खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते झाल्यानंतर हैराण झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी त्यावर टीका केली. खासदार शेवाळे यांनी यानिमित्ताने सरदेसाई यांच्यावर पलटवार केला आहे.
सरदेसाईंना उद्द्येशून ते माणाले की, माझा आता केवळ एकच प्रश्न आहे, आता दादर जनतेसाठी सुरू झालेल्या सौन्दर्यीकरणाच्या कामात तुम्हाला खोडा घालायचा आहे का? तुम्ही केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी काही अधिकाऱ्यांना हाताशी पकडून अशास्त्रीय पद्धतीने दादर चौपाटी इथं टेट्रापॉड टाकलेत. याच कामाला तुम्ही सुशोभीकरण म्हणत असाल तर तुम्ही सुशोभीकरण केलंत. आता राहिला प्रश्न कालच्या भूमीपूजनाचा.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडे सतत पाठपुरावा करून हा प्रकल्प मी मंजूर करून घेतला. या प्रकल्पात होणारी विविंग गॅलरी, प्रोमोनाड, सोलर पॅनल या गोष्टींची संकल्पना माझी होती. मला कंत्राटदाराच्या फायद्यासाठी केवळ चौपाटीवर एक रस्ता बनवायचा नव्हता तर दादरकर जनतेसाठी आणि पर्यायाने मुंबईकरांसाठी एक नवं लँडमार्क टुरिस्ट डेस्टिनेशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाला जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे आपल्यासारख्या जनतेने नाकारलेल्या लोकप्रतिनिधीने कितीही आकांडतांडव केले, तरी ते व्यर्थ आहे. दादर शिवाजीपार्कच्या सुशोभिकरणाच्या कामात खोडा घालून ते सुशोभिकरण जसं मनसेमुळे रखडलं आहे, तसा प्रकार मी या दादर चौपाटी सौन्दर्यीकरणाच्या बाबतीत होऊ देणार नाही, असेही दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले.”
“नितीन सरदेसाईंवर केला पलटवार