HomeArchiveगोरेगाव, पहाडी येथे...

गोरेगाव, पहाडी येथे म्हाडाची १ हजार ९४७ घरे – मधु चव्हाण

Details
“गोरेगाव, पहाडी येथे म्हाडाची १ हजार ९४७ घरे – मधु चव्हाण”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गोरेगाव, पहाडी येथे म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत पंतप्रधान आवास योजनेतून १ हजार ९४७ घरांची निर्मिती करण्यात येणार असून साधारण दोन वर्षात ही घरे पूर्ण होतील अशी माहिती, म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी दिली.

म्हाडा प्राधिकरणाचा २०१९-२० वर्षाकरिता ८ हजार २५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. त्यावेळी सभापती मधु चव्हाण यांनी ही माहिती दिली. १ हजार ५६६.७५ कोटी रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात नवीन प्रकल्पासह गृहनिर्माण उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. म्हाडा मुंबई मंडळांतर्गत १ हजार ९४७ घरांची निर्मिती होणार आहे. जमीन खरेदीसह गृहनिर्माण विकासासाठी १०० कोटी व वसाहतींच्या पायाभूत सुविधांसाठी ५०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात आहे.

म्हाडाच्या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीकरिता ५ कोटी २८ लाख रुपये आणि संक्रमण शिबिरासाठी ५ कोटी रुपये प्रस्तावित आहेत. म्हाडाचा २०१९-२० वर्षांचा अर्थसंकल्प ८ हजार २५९.७५ कोटी रुपयांचा असून यातील शासकीय अनुदानाची रक्कम ४५७.४४ कोटी रुपये एवढी आहे. महसुली रक्कम १ हजार ५२९.८५ कोटी, भांडवली रक्कम ५ हजार १०.१६ कोटी, अनामत रक्कम ८४०.७१ कोटी रुपये इतकी आहे.

अर्थसंकल्पातील खर्चाचा विचार करता महसुली खर्च १ हजार ४८.४८ कोटी रुपये, भांडवली खर्च ४ हजार ६६३ कोटी, कर्ज व अग्रीम १५४.८७ कोटी तसेच अनामत रकमेचा खर्च ७२७.६१ कोटी रुपये आहे. यात एकूण खर्चाचा विचार करता तो ६ हजार ५९४.९२ कोटी रुपये असून, यात ९८ कोटींची भर पडली आहे. म्हाडा आणि शासन असा विचार करता ही खर्चाची रक्कम ६ हजार ६९२.९२ कोटी रुपये इतकी आहे. तर शिल्लक रक्कम १ हजार ५६६.८३ कोटी रुपये इतकी आहे, असेही चव्हाण म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content