HomeArchiveशाखाप्रमुख ते संसदीय...

शाखाप्रमुख ते संसदीय गटनेते!

Details
शाखाप्रमुख ते संसदीय गटनेते!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

मनोहर कुंभेजकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सिंधुदूर्ग येथील खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत यांची 17 व्या लोकसभेतील शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते म्हणून घोषणा केली. लोकसभेत शिवसेनेचे एकूण 18 खासदार निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात. 2014 व आता 2019 मध्ये ते सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून सिंधुदूर्गमधून निवडून आले आहेत.

कोकणातून मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या विनायक राऊत यांनी गरिबीत रस्त्यावर कपबश्या विकून शिक्षण पूर्ण केले आणि शिवसेनेत स्वतःचे स्थान निर्माण केले. शिवसैनिकांमध्ये भाई या टोपणनावाने ते ओळखले जातात. 1980 साली सांताक्रूझ पूर्व वाकोला येथून शाखाप्रमुख म्हणून त्यांनी शिवसेनेत राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली.1985 साली ते वाकोला येथून मुंबई महानगर पालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. वाकोला येथील रामेश्वर शिक्षण संस्था व रामेश्वर सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक आहेत. 1999 साली विलेपार्ले मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून ते निवडून आले. 1999 ते 2004 पर्यंत त्यांची आमदार म्हणून कामगिरी प्रभावी राहिली.

2005 साली शिवसेनाप्रमुखांनी त्यांची शिवसेना सचिव म्हणून निवड केली. 2012 साली त्यांची विधान परिषदेवर निवड झाली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले. कोकण शिवसेनेच्या नेहमी पाठीमागे राहिले आहे. दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी काँग्रेसचे नवीनचंद्र बांदीवडेकर आणि महाराष्ट्र स्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणे यांना त्यांनी धूळ चारली. राणे यांना आघाडी घेता आलेली नाही. विनायक राऊत यांनी १ लाख ७६ हजार ६९१ मतांनी दणदणीत विजय मिळवला. अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले राऊत हे यांनी एमए राज्यशास्त्रांत पदवी घेतली आहे. संसदेत त्यांनी प्रभावी भाषणे करून ठसा उमटवला तर दुसरीकडे सिंधुदूर्गमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे माजी खासदार निलेश राणे यांना टक्कर देत शिवसेना पक्ष मजबूत केला. खरे तर त्यांचे नाव मोदी मंत्रिमंडळात मंत्री म्हणून चर्चेत होते. मात्र फक्त दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची अवजड उद्योग मंत्री म्हणून वर्णी लागली.”
 
“मनोहर कुंभेजकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content