Friday, October 18, 2024
HomeArchiveअटल स्मृती उद्यान...

अटल स्मृती उद्यान तरूण पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशात नवभारताची संकल्पना रूजविली. आज दिसणाऱ्या विकासाचा पाया अटलजींनी रचला आहे. त्यांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्त्व तरूण पिढीला प्रेरणा देण्यासाठी अटल स्मृती उद्यान उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी व्यक्त केला.

बोरिवली येथे उभारण्यात आलेल्या अटल स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री योगेश सागर, राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार भाई गिरकर, प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी आदी उपस्थित होते.
 
अटल स्मृती उद्यान हे श्रद्धेय अटलजींची सर्वोत्तम स्मृती आहे. या उद्यानांतून ते आपल्यात आहेत असाच भास होतो. अटलजींचे व्यक्तिमत्त्व हे निस्पृह, कणखर आणि अतुलनीय कटिबंधता असणारे आहे. अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सर्वाधिक विकास दर होता. त्यांनी सुरू केलेला विकासाचा सपाटा आजही सुरू आहे, असे ते म्हणाले.
 
अटल स्मृती उद्यानाजवळ होणाऱ्या मेट्रो स्थानकास या उद्यानाचे नाव द्यावे, अशी मागणी तावडे यांनी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून या स्थानकास अटल स्मृती उद्यान मेट्रो स्थानक असे नाव देण्यासंबंधी मेट्रो कार्पोरेशनला कळविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अटल बिहारी वाजपेयी हे आदरणीय व्यक्तिमत्व होते. अशा व्यक्तिमत्वाकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्यांचे प्रत्येक भाषण, विचार हे पुढील पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे काम या उद्यानाच्या माध्यमातून होणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...
Skip to content