HomeArchiveहाजी अलीला उड्डाणपूल...

हाजी अलीला उड्डाणपूल उभारा : मंगल प्रभात लोढा

Details
हाजी अलीला उड्डाणपूल उभारा : मंगल प्रभात लोढा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील हाजी अली दरगाह आणि पवित्र तलाव बाणगंगा ही दोन्ही आस्थेची ठिकाणे आहेत. या प्रसिद्ध ठिकाणी दररोज हजारो लोक, भाविक येत असतात. मात्र, येथे आल्यावर लोकांना वाहतूक कोडींसह काही अडचणींचा सामना करावा लागतो. या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबरोबरच बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याची गरज आहे, अशी मागणी मलबार हिलचे भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

आमदार मंगल प्रभात लोढा यांनी एका निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही लोढा यांनी विधानसभेत हाजी अली येथील वाहतूक कोंडी आणि बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. यावेळी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबाबत प्रस्ताव तयार केल्याचे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सांगितले होते.

मुंबईमधील पश्चिम उपनगरातील लोकांना दक्षिण मुंबईत यायचे झाल्यास हाजी अली जंक्शनलाच वळसा घालून यावे लागते. यामुळे हाजी अली जंक्शन येथे सतत वाहतूक कोंडी होऊन चारचाकी गाड्यांची मोठी रांग लागलेली असते. हजारो वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण होतेच शिवाय पर्यावरणाचीदेखील हानी होत आहे. यातून सर्व समस्यांतून सुटका करण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारावा अशी मागणी सातत्याने आमदार लोढा यांनी लावून धरली आहे. हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल कसा गरजेचा आहे याचे सादरीकरण आणि माहितीही वेळोवेळी सरकारी पातळीवर दिली आहे.

बाणगंगा हे मुंबईतील सर्वात पौराणिक धर्मस्थळांपैकी एक असून, हेरिटेज यादीतील एक पर्यटनस्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. बाणगंगा येथे सुमारे दहा हजारांहून अधिक लोक राहतात. परंतु, येथील रॉकी हिल मार्ग बंद केल्याने स्थानिक नागरिकांना याचा त्रास होतो. येथील स्थानिकांना पीडब्ल्यूडी कॉलनी येथून जावे लागते. शिवाय रॉकी हिल मार्ग बंद केल्याने बाणगंगा परिसरात अग्निशमन दलाची गाडी अथवा रूग्णवाहिकाही जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्व बाजू लक्षात घेता बाणगंगेकडे जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content