HomeArchiveमागाठाणेत तत्काळ दाखले...

मागाठाणेत तत्काळ दाखले शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद!

Details
मागाठाणेत तत्काळ दाखले शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची महाविद्यालयीन प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र अनेक वेळा विद्यार्थ्यांकडे जातीचे दाखले वेळेवर उपलब्ध नसल्याने त्यांना प्रवेश मिळवण्यासाठी कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांच्या दाखल्याची अडचण दूर होऊन त्यांना तत्काळ दाखले उपलब्ध होण्यासाठी मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी तत्काळ दाखले शिबिराचे नुकतेच आयोजन केले होते. तत्काळ दाखले शिबिराला विद्यार्थाना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 500 विद्यार्थ्यांना तत्काळ दाखले वितरित करण्यात आले. सर्व प्रमाणपत्र विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे आणि महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.

बोरिवली पूर्व श्रीकृष्ण नगर येथील चौगुले शाळेत या तत्काळ दाखले शिबिराचे आयोजन तहसिलदार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. याकामी उपनगर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आणि बोरिवलीचे तहसीलदार विनोद धोत्रे यांनी मोलाचे सहकार्य केले अशी माहिती आमदार सुर्वे यांनी दिली. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुखांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे या तत्काळ दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेली चार वर्षे सातत्याने सदर दाखले शिबिराचे आपण मागाठाण्यात आयोजन करत असून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना दाखल्याचे वितरण करण्यात आले असल्याची त्यांनी सांगितले. मागाठाणे विभागातील शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरीक यांना ज्येष्ठ नागरिक कार्ड, व विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्याकरिता होणारा त्रास लक्षात घेऊन तत्काळ दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरात उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र आणि स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आली.

यावेळी विभागातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, पुरूष/महिला विधानसभा संघटक, उपविभागप्रमुख, महिला उपविभागसंघटक, शाखाप्रमुख, महिला शाखासंघटक आणि शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content