HomeArchiveमंगल प्रभात लोढा...

मंगल प्रभात लोढा मुंबई भाजपचे अध्यक्ष!

Details
मंगल प्रभात लोढा मुंबई भाजपचे अध्यक्ष!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते २५ वर्षांपासून आमदारपद भूषवत आहेत. राजकारणात स्वच्छ आणि मजबूत प्रतिमा असलेले मंगल प्रभात लोढा यांनी या नवीन जबाबदारीसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या संकल्पनेतून पक्षाला अधिक बळकट बनवून पुढे घेऊन जाण्याचे काम आपण करणार.

महाराष्ट्र विधानसभेचे पाचव्यांदा सदस्य असलेले लोढा १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये मुंबईच्या मलबार हिल विधानसभा क्षेत्रातून विजयी होत आले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७० हजार मताधिक्याने विजय मिळवत महाराष्ट्रात सर्वधिक मतांनी विजय मिळविण्याचा बहुमानही त्यांनी मिळवला होता. १८ डिसेंबर १९५५ रोजी जन्मलेले लोढा जोधपूर विद्यापीठातून बीकॉम, एलएलबी झाले. शिक्षण घेतल्यानंतर ते वकिलीचा पेशा करू लागले होते. विद्यार्थीदशेपासूनच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याशी जोडले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले. विद्यार्थी जीवनात लोढ़ा जोधपूर विश्वविद्यालयाचे महासचिवदेखील होते.

त्यांचे वडील सुप्रसिद्ध न्यायमूर्ती गुमानमल लोढा यांनी तीन वेळा खासदारपद भूषवले असून राष्ट्रवादी विचारधारेच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांना राष्ट्रवादाचे संस्कार त्यांच्या वडिलांकडून मिळाले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आमदार लोढ़ा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासचिव आणि प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

लोढा यांनी १९८७ पासून एकूण ९ लोकसभा निवडणुकीत विविध पदांवरील मुख्य जबाबदारी पेलली असून एक यशस्वी रणानितीकार म्हणून त्यांची छबी निर्माण झालेली आहे. विद्यार्थीदशेत त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातही सक्रिय भूमिका बजावली होती. ते १९८१ मुंबईला आले. कंस्ट्रक्शन व्यवसाय स्थापित करून त्यांनी हा व्यवसाय आपल्या मुलांकडे सोपवला असून ते आता पूर्णवेळ राजकारणात सक्रिय असून समाजकार्य करत आहेत. ते म्हणाले की, देशाच्या सर्वात मोठ्या महानगराच्या अध्यक्षपदाची आपल्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ती सर्वांच्या सहकार्याने पूर्णपणे पार पाडणार.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...

युपीआय आणि रुपे व्यवहारांवरच्या शुल्कामागे अमेरिकेचा दबाव?

युपीआय आणि रुपे कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर लवकरच 'मर्चंट डिस्काउंट रेट' (एमडीआर) म्हणजेच शुल्क लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने नुकतेच संसदेत 'टॅक्सेशन अँड अदर लॉज (अमेंडमेंट) बिल २०२६' मंजूर केले आहे. यामुळे, सध्याच्या 'झीरो-एमडीआर' (मोफत व्यवहार) धोरणात...
Skip to content