HomeArchiveवेसाव्यातील मच्छिमारांना डिझेल...

वेसाव्यातील मच्छिमारांना डिझेल परतावा लवकरच – भारती लव्हेकर

Details
वेसाव्यातील मच्छिमारांना डिझेल परतावा लवकरच – भारती लव्हेकर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मासेमारीत केरळनंतर वेसावे कोळीवाड्याचा नंबर लागतो. येथे सुमारे 350 यांत्रिकी नौका असून येथील दोन मच्छिमार सहकारी सोसायट्यांचा गेल्या 20 महिन्यांचा डिझेल परतावा लवकर देण्यात येईल असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच वर्सोव्याच्या भाजपाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांना दिले.

येथील वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा 13.2 कोटी व वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटी लिमिटेड या मच्छिमार सहकारी संस्थेचा 2.60 कोटी असा गेल्या 20 महिन्यांचा मिळून 16 कोटी 62 लाख रूपये डिझेल प्रतिपूर्ती परतावा अर्थसंकल्पात तरतूद करूनही अजून मिळालेला नाही. त्यामुळे वेसावकर हवालदिल झाले आहेत. डिझेल व मासेमारी साधनांचे भाव वाढल्याने मासेमारी करणे येथील मच्छिमारांना मुश्किल झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर सदर परताव्याची रक्कम वितरित करण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

आमदार डॉ. लव्हेकर यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनीही वेसावे कोळीवाड्यातील सदर दोन मच्छिमार सहकारी संस्थांना लवकर प्राधान्याने डिझेल परतावा मिळेल असे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली.

येथील मच्छिमारांच्या विविध समस्या मार्गी लागण्यासाठी लव्हेकर यांनी अलीकडेच वेसाव्यातील विविध मच्छिमार संस्थांचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांची महत्त्वाची संयुक्त बैठक मत्स्यव्यवसाय आयुक्त सुमंत भांगे यांच्याबरोबर त्यांच्या कार्यालयात आयोजित केली होती. 2014 मध्ये येथून आमदार म्हणून निवडून आल्यापासून येथील मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे व विधानसभेतदेखील विविध आयुधांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content