HomeArchiveया चिमण्यांनो परत...

या चिमण्यांनो परत फिरा रे..

Details
या चिमण्यांनो परत फिरा रे..

    31-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

केएचएल न्यूज ब्युरो
शहरातील काँक्रीटच्या जंगलात हिरवळ निर्माण व्हावी, या उद्द्येशाने जपानच्या ‘अकीरा मियावाकी’, या तंत्राचा वापर करून हिरवळीची छोटी बेटं निर्माण करण्याचा उपक्रम मुंबईतल्या कांदिवली पूर्व मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राबविला आहे.
नवनवीन कल्पना अंमलात आणणारे आमदार भातखळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प कांदिवलीच्या लोखंडवाला संकुलात राबविण्यात आला आहे. शहीद अब्दुल हमीद यांचे नाव दिलेल्या या फॉरेस्ट गार्डनचे नुकतेच थाटात लोकार्पण झाले. या उद्यानामुळे कमी होत चाललेल्या चिमण्या, फुलपाखरं पुन्हा परततील, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.
 
केशवसृष्टी, ‘माय ग्रीन सोसायटी’ या उपक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या या जपानच्या ‘अकीरा मियावाकी’ या तंत्रामुळे कमी जागेत भरपूर हिरवळ निर्माण होते. अनेक ठिकाणी अशी सिटी फॉरेस्ट तयार केली जात आहेत. ‘एचडीएफसी लाइफ’ने या उपक्रमाला आर्थिक बळ दिले. या उद्यानाची जागा कित्येक वर्षे पडीक होती. आमदार भातखळकर यांच्या प्रयत्नांमुळेच या पडीक जागेची स्वच्छता तसेच तिला सुपिक बनविण्याचे प्रयत्न झाले. शहरात आरेसारखा प्रचंड मोठा हरीत पट्टा असलेले मुंबई हे जगातले एकमेव शहर. परंतु शहरीकरणाच्या रेट्याखाली ही हिरवळ आक्रसत चालली आहे. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे अशाप्रकारे हिरवळ निर्माण करण्याचे उपक्रम हाती घेतले पाहिजेत, असे भातखळकर म्हणाले. मुंबईत आणखी काही ठिकाणी हा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ‘एचडीएफसी लाइफ’चे उपाध्यक्ष सुब्रतो रॉय, ‘केशवसृष्टी’चे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, नगरसेविका सुरेखा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
 
 ”

“शहरातील काँक्रीटच्या जंगलात हिरवळ निर्माण व्हावी, या उद्द्येशाने जपानच्या ‘अकीरा मियावाकी’, या तंत्राचा वापर करून हिरवळीची छोटी बेटं निर्माण करण्याचा उपक्रम मुंबईतल्या कांदिवली पूर्व मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राबविला आहे.”

“नवनवीन कल्पना अंमलात आणणारे आमदार भातखळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प कांदिवलीच्या लोखंडवाला संकुलात राबविण्यात आला आहे. शहीद अब्दुल हमीद यांचे नाव दिलेल्या या फॉरेस्ट गार्डनचे नुकतेच थाटात लोकार्पण झाले. या उद्यानामुळे कमी होत चाललेल्या चिमण्या, फुलपाखरं पुन्हा परततील, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.”
 
“केशवसृष्टी, ‘माय ग्रीन सोसायटी’ या उपक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या या जपानच्या ‘अकीरा मियावाकी’ या तंत्रामुळे कमी जागेत भरपूर हिरवळ निर्माण होते. अनेक ठिकाणी अशी सिटी फॉरेस्ट तयार केली जात आहेत. ‘एचडीएफसी लाइफ’ने या उपक्रमाला आर्थिक बळ दिले. या उद्यानाची जागा कित्येक वर्षे पडीक होती. आमदार भातखळकर यांच्या प्रयत्नांमुळेच या पडीक जागेची स्वच्छता तसेच तिला सुपिक बनविण्याचे प्रयत्न झाले. शहरात आरेसारखा प्रचंड मोठा हरीत पट्टा असलेले मुंबई हे जगातले एकमेव शहर. परंतु शहरीकरणाच्या रेट्याखाली ही हिरवळ आक्रसत चालली आहे. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे अशाप्रकारे हिरवळ निर्माण करण्याचे उपक्रम हाती घेतले पाहिजेत, असे भातखळकर म्हणाले. मुंबईत आणखी काही ठिकाणी हा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ‘एचडीएफसी लाइफ’चे उपाध्यक्ष सुब्रतो रॉय, ‘केशवसृष्टी’चे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, नगरसेविका सुरेखा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.”

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content