HomeArchiveपु. ल. देशपांडे...

पु. ल. देशपांडे का नाम बोले और हसे नही, तो कैसे चलेगा? – पंतप्रधान मोदी

Details
“पु. ल. देशपांडे का नाम बोले और हसे नही, तो कैसे चलेगा? – पंतप्रधान मोदी”

    09-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
थोर साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून मुंबईच्या विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघातील पु. ल. गौरव कला दालनात पु. लं.च्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुंबईच्या दौऱ्यात अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थितांना त्यांनी “”या दालनात आलेली मंडळी दिवसातून किती तास हसतात?”” असे विचारले. “”पु. ल. देशपांडे का नाम बोले और हसे नही, तो कैसे चलेगा”” असे उद्गार काढत त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या गुणवैशिष्ट्याचा खास गौरव केला.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विलेपार्लेच्या लोकमान्य सेवा संघाच्या शतक महोत्सवी गणेशोत्सवात गणरायाचे दर्शन घेतले व मनोभावे पूजन केले. ऐतिहासिक मूल्य असलेल्या शतक महोत्सवी गणेशोत्सवानिमित्त लोकमान्य सेवा संघाचे तसेच विलेपार्लेतील सांस्कृतिक समृद्धतेचे त्यांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याप्रसंगी विलेपार्लेच्या इतिहासाचे दोन खंड संस्थेमार्फत तर स्थानिक भाजपा आमदार पराग अळवणी व नगरसेविका ज्योती अळवणीलिखित तसेच ख्यातनाम चित्रकार सुहास बहुलकरलिखित पुस्तकेही देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद चितळे, कार्याध्यक्ष उदय तारडाळकर, उद्योजक दीपक घैसास, आमदार पराग अळवणी तसेच ज्योती अळवणी, नगरसेविका सुनीता मेहता, नगरसेवक अनिष मकवानी, नगरसेवक अभिजीत सामंत, मुरजी पटेल व मान्यवर उपस्थित होते.
 
 

 
 
 
 
 
 
 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“थोर साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून मुंबईच्या विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघातील पु. ल. गौरव कला दालनात पु. लं.च्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुंबईच्या दौऱ्यात अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थितांना त्यांनी “”या दालनात आलेली मंडळी दिवसातून किती तास हसतात?”” असे विचारले. “”पु. ल. देशपांडे का नाम बोले और हसे नही, तो कैसे चलेगा”” असे उद्गार काढत त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या गुणवैशिष्ट्याचा खास गौरव केला.”
 
 
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विलेपार्लेच्या लोकमान्य सेवा संघाच्या शतक महोत्सवी गणेशोत्सवात गणरायाचे दर्शन घेतले व मनोभावे पूजन केले. ऐतिहासिक मूल्य असलेल्या शतक महोत्सवी गणेशोत्सवानिमित्त लोकमान्य सेवा संघाचे तसेच विलेपार्लेतील सांस्कृतिक समृद्धतेचे त्यांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.”
 
 
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याप्रसंगी विलेपार्लेच्या इतिहासाचे दोन खंड संस्थेमार्फत तर स्थानिक भाजपा आमदार पराग अळवणी व नगरसेविका ज्योती अळवणीलिखित तसेच ख्यातनाम चित्रकार सुहास बहुलकरलिखित पुस्तकेही देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद चितळे, कार्याध्यक्ष उदय तारडाळकर, उद्योजक दीपक घैसास, आमदार पराग अळवणी तसेच ज्योती अळवणी, नगरसेविका सुनीता मेहता, नगरसेवक अनिष मकवानी, नगरसेवक अभिजीत सामंत, मुरजी पटेल व मान्यवर उपस्थित होते.”
 
 

 
 
 
 
 
 
 

Continue reading

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...

युपीआय आणि रुपे व्यवहारांवरच्या शुल्कामागे अमेरिकेचा दबाव?

युपीआय आणि रुपे कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर लवकरच 'मर्चंट डिस्काउंट रेट' (एमडीआर) म्हणजेच शुल्क लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने नुकतेच संसदेत 'टॅक्सेशन अँड अदर लॉज (अमेंडमेंट) बिल २०२६' मंजूर केले आहे. यामुळे, सध्याच्या 'झीरो-एमडीआर' (मोफत व्यवहार) धोरणात...
Skip to content