HomeArchiveगिरीजा कीरांच्या 'कुणा...

गिरीजा कीरांच्या ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’चे प्रकाशन!

Details
गिरीजा कीरांच्या ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’चे प्रकाशन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुप्रसिद्ध साहित्यिका गिरीजा कीर यांच्या भरारी प्रकाशन प्रकाशित ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’ या कादंबरीचे तसेच लता गुठे यांच्या संत चेतन्य सोहळा, या पुस्तकांचे शानदार प्रकाशन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमी येथे नुकतेच झाले. यावेळी सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. विनोद इंगळहळीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी कादंबरीच्या कथानकाचे आणि मांडणीचे विश्लेषण केले.

गिरीजा कीर म्हणजे कथाकथन हे समीकरण ठरलेलं. जुन्या पिढीबरोबर साहित्याला पूरक ठरणारं कथाकथन आज हळूहळू लोप पावत चाललेलं दिसतंय म्हणून भरारी प्रकाशनाच्या प्रकाशिका लता गुठे आणि संत साहित्याच्या अभ्यासक रेखा नार्वेकर यांनी गिरिजा कीर कथाकथन स्पर्धा हा उपक्रम सुरू केला आहे. यानंतर कथाकथन पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला.

गिरीजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना स्पर्धक भारावून गेले. एकनाथ आव्हाड यांनी परीक्षक म्हणून समालोचन केले. याप्रसंगी रेखा नार्वेकर यांच्या ‘जागर’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. गुरूनाथ तेंडुलकर यांनी मोजक्या शब्दात पुस्तकाचं रसग्रहण केलं. लता गुठे यांच्या ‘संत साहित्याचा मेळा’ यांच्या पुस्तकाचंही प्रकाशन झालं. रेखा नार्वेकर यांनी या पुस्तकाचे रसग्रहण केले. या कार्यक्रमाचा उल्लेखनीय विशेष म्हणजे पत्रकार व लेखक वसंत बंदावणे यांनी प्रस्तुत कादंबरी ‘कुणा नामदेवाची चित्रकथा’ याविषयी सांगताना कादंबरीचा नायक आपणच आहोत ही मर्मबंधातली ठेव उघड केली. सभागृहात क्षणभर सन्नाटा पसरला. त्यांच्या जीवनातील चढ-उतार आणि भोगवटा ऐकताना रसिक मनं हेलावली. लता गुठे यांची साहित्यिक वाटचाल जशी रोचक तशीच प्रसन्नवदना मृण्मयी भजक यांचं सूत्रसंचालन प्रसंगोचित होतं.

दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध आणि हौतात्म्यप्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजलीने सुरू झालेला कार्यक्रम सोहळा हळूहळू साहित्यिकांकडे वळला. पुरस्कार वितरणानं तो प्रसन्न ठरला. विविध वक्त्यांच्या मनोगतांमुळे रसिकांना बांधून ठेवणारा ठरला. डॉक्टर विनोद इंगळहळीकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमानं उंची गाठली. तुका झालासे कळस म्हणत जाणकार रसिक तृप्त होऊन बाहेर पडले. भरारी प्रकाशननं आणखी उंच भरारी घेतली. अनेक क्षेत्रातील मान्यवर कवी लेखक या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content