HomeArchiveहिंदी साहित्य अकादमीचे...

हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार वितरीत!

Details
हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार वितरीत!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी आहे. म्हणूनच ही कला राजाश्रीत नाही तर राजपुरस्कृत होणे आवश्यक असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत सांगितले. कला आणि कलाकारांना प्रोत्साहन दिल्यास या कलांचे श्रेष्ठत्व वाढून नवीन पिढीला यातून प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या के. सी. महाविद्यालयातील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्कार सोहळ्यात तावडे बोलत होते. राज्य शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीमार्फत सन २०१७-१८ या वर्षातील पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. यावेळी तावडे यांच्यासह हिंदी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. शितलाप्रसाद दुबे, हिंदी साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष नंदलाल पाठक, फिल्मसिटीचे उपाध्यक्ष अमरजित मिश्र, कर्नल लेफ्टनंट मनोजकुमार सिन्हा, आमदार मंगल प्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. हिंदी साहित्य अकादमीमार्फत तीन प्रकारचे पुरस्कार दिले गेले. यामध्ये २ अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, ८ राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार तसेच २० विधा पुरस्कार अश्या एकूण ३० पुरस्कारांचा समावेश होता.

तावडे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषा व साहित्याच्या ‍विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. महाराष्ट्रातल्या लेखकांनी मराठीबरोबरच इतर भाषांमध्ये लेखन करणेही आवश्यक आहे. आजही ही अकादमी विविध पातळ्यांवर साहित्यिकांची नोंद घेते, त्यांच्या साहित्याचे संवर्धन करते. इतर भाषांतील उच्च दर्जाचे साहित्य हिंदी भाषेत उपलब्ध झाल्यास साहित्यिकांचा हा ठेवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.

यावर्षी ‘अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव’ पुरस्कारांमध्ये ‘महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार’ रंगनाथ तिवारी आणि डॉ. ‘राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार’ रामेश्वरनाथ मिश्र ‘अनुरोध’ यांना प्रदान करण्यात आला.

‘राज्य स्तरीय सम्मान जीवनगौरव पुरस्कार’ पुरस्कारांतर्गत ‘छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकता पुरस्कार’ प्रेम शुक्ल, ‘साने गुरूजी राष्ट्रीय एकता पुरस्कार’ मंजु लोढा, ‘पद्मश्री अनंत गोपाल शेवडे हिंदी सेवा पुरस्कार’ डॉ. तेजपाल चौधरी, ‘डॉ उषा मेहता हिंदी सेवा पुरस्कार’ पूजाश्री, ‘गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार’ सुधीर ओखदे, ‘कांतीलाल जोशी इतर हिंदी भाषी हिंदी लेखक पुरस्कार’ माणिक बाबुराव मुंडे, ‘व्ही शांताराम ललित कला हिंदी विशिष्ट सेवा पुरस्कार’ डॉ. विनोद नारायण इंदुरकर, ‘सुब्रमण्य भारती हिंदी सेतू विशिष्ट सेवा पुरस्कार’ डॉ. श्रीभगवान तिवारी यांना प्रदान करण्यात आला.

‘विधा’ पुरस्कारांतर्गत ‘काव्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘संत नामदेव पुरस्कार’ शीतला पांडेय-समीर ‘अनजान’ यांना स्वर्ण, सुधा राठौर यांना रजत तसेच डॉ मुकेश गौतम यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘कहानी’ या विधासाठी देण्यात येणारा ‘मुंशी प्रेमचंद पुरस्कार’ मंजुला जोशी यांना स्वर्ण, कृष्ण नागपाल यांना रजत, तसेच डॉ. शशी वर्धन शर्मा-(शैलेश) यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘निबंध’ या विधासाठी देण्यात येणारा ‘आचार्य रामचंद्र शुक्ल पुरस्कार’ प्रभा मेहता यांना स्वर्ण, शिव प्रसाद तिवारी यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘समीक्षा’ या विधासाठी देण्यात येणारा ‘आचार्य नंददुलारे वाजपेयी पुरस्कार’ डॉ. मजीद शेख यांना स्वर्ण, डॉ. पंडित बन्ने यांना रजत, डॉ. शशिकांत सोनवणे ‘सावन’ यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘अनुवाद’ या विधासाठी देण्यात येणारा ‘मामा वरेरकर पुरस्कार’ कुमुद संघवी चावरे यांना स्वर्ण व रासबिहारी पाण्डेय यांना रजत पुरस्कार देण्यात आला. ‘वैज्ञानिक तकनीकी’ या विधासाठी देण्यात येणारा ‘होमी जहांगीर भाभा कांस्य पुरस्कार’ मुकेश ग. पंडया यांना देण्यात आला आहे.

‘हिंदी भाषा, भाषा शास्त्र तथा व्याकरण संबंधी लेखन’ या विधासाठी देण्यात येणारा ‘पं. महावीर प्रसाद व्दिवेदी कांस्य पुरस्कार’ डॉ. दिनेश प्रताप सिंह यांना देण्यात आला. ‘नाटक’ या विधासाठी देण्यात येणारा ‘विष्णुदास भावे स्वर्ण पुरस्कार’ डॉ. मधुकर राठोड यांना देण्यात आला. ‘जीवनी-परक साहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘काका कालेलकर रजत पुरस्कार’ डॉ. जितेन्द्र पाण्डेय यांना देण्यात आला. ‘पत्रकारिता-कला’ या विधासाठी देण्यात येणारा ‘बाबुराव विष्णु पराडकर कांस्य पुरस्कार’ अनूप श्रीवास्तव यांना, तर ‘लोकसाहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘फणीश्वरनाथ रेणू स्वर्ण पुरस्कार’ निर्मला डोसी यांना देण्यात आला. ‘बालसाहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘सोहनलाल व्दिवेदी कांस्य पुरस्कार’ नीलम सक्सेना ‘चंद्रा’ यांना देण्यात आला.

सर्व पुरस्कार विजेत्यांना अकादमीकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम दिली जाते. ‘अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव’ पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये रोख, ‘राज्यस्तरीय सम्मान जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रूपये रोख असे आहे. विधा पुरस्कार स्वर्ण, रजत, कांस्य अश्या तीन प्रकारात अनुक्रमे ३५ हजार रूपये, २५ हजार रूपये आणि ११ हजार रूपये अशा स्वरूपात देण्यात आला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content