HomeArchiveशिवनेरकार विश्वनाथराव वाबळे...

शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराने १२ ज्येष्ठ पत्रकार सन्मानित!

Details
शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराने १२ ज्येष्ठ पत्रकार सन्मानित!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
`शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांच्या 102 व्या जयंतीच्या निमित्ताने रविवारी १२ ज्येष्ठ पत्रकारांना `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे स्मृती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

`शिवनेर’कार वाबळे क्रीडाप्रेमी होते. बुद्धिबळ हा त्यांचा आवडता खेळ. यादृष्टीने शिवनेर, सावतमाळी भुवन ट्रस्ट आणि आयडियल स्पोर्टस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षांखालील शालेय विद्यार्थ्यांची जलद बुद्धिबळ स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 48 मुला-मुलींनी भाग घेतला. `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराचे वितरण मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय बरदाडे व रामिम संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

`शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत: सूर्यकांत फातर्फेकर, संदीप चव्हाण, प्रसाद मोकाशी, स्वाती घोसाळकर, जगदीश भोवड, प्रदीप म्हापसेकर, श्रीकांत नाईक, विजयकुमार बांदल, लीलाधर चव्हाण, सुधाकर काश्यप, संजय परब आणि प्रकाश सावंत. नंदकुमार काटकर यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांनी तळागाळातील लोकांसाठी पत्रकारिता केली. तोच वारसा आज `शिवनेर’चे संपादक नरेंद्र वि. वाबळे चालवत आहेत, असे ते म्हणाले. सावतामाळी भुवन ट्रस्टचे हेमंत मंडलिक आणि सदानंद पोहेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी `शिवनेर’च्या वतीने संपादक नरेंद्र वि. वाबळे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाला एक कॅरम बोर्ड, स्टॅण्ड आणि चार बुद्धिबळ सेट भेट दिले. पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी ते स्वीकारले.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content