HomeArchiveदुर्लभ 'डॉकयार्ड' कलाकारी...

दुर्लभ ‘डॉकयार्ड’ कलाकारी बघण्याची संधी!

Details
दुर्लभ ‘डॉकयार्ड’ कलाकारी बघण्याची संधी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]

नौदलाच्या विविध जहाजांवर आपल्या रंग कौशल्याने चित्रकारिता करणाऱ्या तसेच नाना प्रकारच्या देखण्या शो पिसची निर्मिती करणाऱ्या कलाकारांची कला पाहण्याची संधी लोकांना खुली होतेय. उद्या नि परवा (बुधवार, गुरूवार) बेलार्ड पिअर भागात त्याचं प्रदर्शन ‘धनक’ नावाने लागत आहे. भारतीय नौदलासाठी जहाजांवर, पाणबुडीत नाना प्रकारची चित्रं रेखाटणाऱ्या, रंगकाम तसेच शोभेच्या वस्तू करणाऱ्या कलाकारांचे कौशल्य सादर केले जाणार आहे. त्यांचे कलागुण बाहेरच्यांना फारसे कळत नाहीत. टायगर गेट परिसरात ते सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत पाहता येईल. यात शेकडो चित्रं, कलाकारांनी साकारलेल्या भेटवस्तू प्रकारातील शिल्प, त्यात लोखंडी नि लाकडी, इतर धातूंच्या बाबी मांडल्या जाणार आहेत.

जहाज बांधणी परिसंवाद

मेरिटाईम हिस्ट्री सोसायटीच्या स्थापनादिनी, मे महिन्यात एक परिसंवाद होणार असून त्यासाठी चित्र प्रदर्शन भरणार आहे. भारतातील जहाजबांधणी उद्योगाच्या सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या परंपरेची आठवण म्हणून पश्चिम नौदल कमांड नि मेरिटाईम हिस्ट्री सोसायटीने रविवारी चित्र स्पर्धा ‘कलासागर -२०१९’ आयोजित केली होती. जहाजबांधणीबाबत मार्गदर्शन करून चित्रं काढली गेली. मुंबईतील चित्रशाळा नि इतर महाविद्यालयीन कलाकारांनी यात भाग घेतला. संबंधित चित्रं ज्येष्ठ कलकारांकडून तपासून त्याचंही प्रदर्शन पुढील महिन्यात स्थापनादिनी लावलं जाणार असल्याचे नौदल प्रवक्त्याने म्हंटलं आहे..

रूग्ण मनोरंजन

भा नौ पो I N S कुंजलीच्या बँड पथकाने नुकत्याच विविध धून सादर करीत I N H S अश्विनीमधील रुग्णांचे मनोरंजन केलं. नाविक दलाच्या पत्नींची संघटना असलेल्या ‘नावा’च्या आरोग्य विभागाने यासाठी पुढाकार घेतला. कुलाब्यातील अश्विनी इस्पितळाच्या हिरवळीवर झालेल्या या मैफलीचा जवळपास १५० रूग्णांनी आनंद लूटला. संगीताच्या जादुभऱ्या सुरवटीनी वातावरण तासभर प्रफुल्लित झाले होते. १२ नोव्हेंबर रोजीच्या कार्यक्रमात वरिष्ठ अ अधिकाऱ्यांच्या पत्नी सहभागी झाल्या.

जलतरण स्पर्धा

नौदलाच्या पश्चिम कमांडने ४९वी खुली जलतरण अंतर्गत स्पर्धा आयोजित केली होती. त्यात पंकजकुमार आणि ब्रीजराज वर्मा यांना सुवर्ण, सत्यम रांघड आणि पवन वर्मा यांना रजत, आनंद ठाकूर नि विशाल ठाकूर यांना कांस्य पदक मिळाले. इंडियन नेव्हल वॉटरमनशिप ट्रेनिंग सेंटर इथे ही स्पर्धा ११ ते १५ एप्रिल दरम्यान पार पडली.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content