HomeArchiveवसंतराव देशपांडे यांच्या...

वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाची शानदार सुरूवात

Details
वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाची शानदार सुरूवात

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
शास्त्रीय संगीतातील रत्न म्हणून ख्याती असलेले डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाची सुरूवात लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते मुंबईच्या रवींद्र नाट्यगृहात मोठ्या उत्साहात झाले.

हा सोहळा त्यांचे लाडके शिष्य व संगीत सभेचे प्रमुख विश्वस्त पं. चंद्रकांत लिमये व दक्षिणमध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय) भारत सरकार यांच्या संयोजनाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी अच्युत गोडबोले, पं. शंकर अभ्यंकर, फैयाज, राजू हळदणकर, रवींद्र आवटी, निलय वैद्य, सुरेश महाजन, सुरेश खरे आणि दीपक कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात ग्वालेर घराण्याच्या नुपूर गाडगीळ यांनी राग भीपालासीने केली. त्यानंतर डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यावरील लेख, दुर्मिळ फोटो, त्यांचे पत्र समाविष्ट असलेल्या “नक्षत्र वसंत” स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मान्यवरांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांची गायकी, विनोद बुद्दी, संगीतातली वैविध्य, हरहुन्नरीपणा आदी आठवणींना उजाळा दिला.

यावेळी पं. चंद्रकांत लिमये म्हणाले, “कलागुणांना योग्यवेळी योग्य व्यासपीठ मिळाले तर त्यांना पुढे येण्यासाठी वेळ लागत नाही. याकरीता मी आजवर अनेक होतकरू कलाकारांना माझ्या संस्थेच्या रंगमंचावरून संधी दिली आहे व यापुढेही देण्याचा प्रयत्न करीन. `कट्यार’मध्ये खाँसाहेबांच्या तोंडी एक वाक्य आहे की,”आमच्यानंतरही आमची गायकी (गादी) पुढे चालू राहवी ही आमची दुसरी मुराद आहे”. आणि ती प्रत्यक्ष जीवनात डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यानंतर मी त्याच नाटकात खाँसाहेबांची भूमिका करून सिद्ध केलेली आहे आणि गायकीच्या बाबतीत त्यांची गायकी पुढे नेण्याचं काम मी माझ्या शिष्यांना शिकवून पूर्ण करीत आहे”. त्यांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांचा आजवरचा संगीत प्रवास यावर डॉक्युमेन्ट्री बनविण्याचा मानस व्यक्त केला.

यानंतर `वसंत बहार’ हा डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम पं. चंद्रकांत लिमये यांनी आपल्या गुरूकुलातील शिष्यांसह सादर केला. या कार्यक्रमात डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या बंदीशी, ठुमरी, नाट्यगीते आदी सादर करण्यात आली. यात पं. चंद्रकांत लिमये यांचे शिष्य कैवल्य केजकर यांनी “कट्यार काळजात घुसली” या नाटकातील “सुरत पियाकी” या नाट्यगीताने प्रेक्षकांची दाद मिळवली.

डॉ. वसंतराव देशपांडे हे अतिशय बुद्दिमान, रसिले व नाविन्याचा शोध घेणारे होते, या शब्दांत संगीत विदुषी गायिका प्रभा अत्रे यांनी त्यांचे वर्णन केले. कार्यक्रमाची सांगता प्रभा अत्रे यांच्या जोगकंस, तराना व राग भैरवीने झाली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content