HomeArchiveराज्य मराठी चित्रपट...

राज्य मराठी चित्रपट सोहळ्याला जॉन बेली!

Details
राज्य मराठी चित्रपट सोहळ्याला जॉन बेली!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

२६ मेला रंगणार पुरस्कार वितरण सोहळा
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
येत्या २६ मेला होणाऱ्या ५६ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ऑस्कर अकादमीचे विद्यमान अध्यक्ष जॉन बेली उपस्थित राहणार आहेत. वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे सायंकाळी ६.३० वाजता हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

ऑस्करच्या स्थापनेपासून ऑस्करचे कोणतेही अध्यक्ष यापूर्वी कधीच भारतात आले नव्हते. ऑस्करच्या स्थापनेपासून भारतामध्ये येणारे जॉन बेली हे पहिलेच अध्यक्ष आहेत. हे प्रथमच घडत असावे. ऑस्कर अध्यक्षांना निमंत्रित करून मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय गोष्टी त्यांच्यामार्फत जगभरातील सिनेसृष्टीत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे. जॉन बेली यांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहवे यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक सचिव भूषण गगराणी व ऑस्कर अकादमीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांनी विशेष प्रयत्न केले.

जॉन बेली गेली २ वर्षे ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष आहेत. ऑस्कर अकादमीच्या सिनेमॅटोग्राफर विभागातून त्यांची ही निवड झाली आहे. कॅलिफोर्निया येथील “School of cinematic Art” येथून त्यांनी पदवी प्राप्त केली. १९७१ ते २०१७ पर्यंत वेगवेगळ्या ७० हून अधिक हॉलिवूड चित्रपटांचे त्यांनी छायाचित्रण केले. तसेच हॉलिवूड चित्रपटांसाठीही त्यांनी दिग्दर्शनही केले आहे. “American Society of cinematographers” चा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. येत्या १९ मे रोजी आयोजित केलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेली यांचा विशेष गौरव होणार आहे.

गेले चार वर्षं आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत आहोत. पहिल्यांदा आम्ही मराठी सिनेमा हा “गोवा फिल्म फेस्टीव्हलला” पाठवायला सुरूवात केली आणि जगभरातून येणाऱ्या लोकांना चांगले सिनेमे दाखवायला सुरूवात केली. मग “कान्स”लासुद्धा आपण मराठी सिनेमा पाठवायला लागलो. त्याठिकाणी विश्वातले वेगवेगळे डायरेक्टर्स आणि प्रोडयुसर्स यांना आपण मराठी सिनेमे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे तावडे यांनी सांगितले.

ऑस्करचे अध्यक्ष जॉन बेली २५ मे व २६ मे २०१९ असे दोन दिवस मुंबईत येत आहेत. या दोन दिवसात बेली महाराष्ट्र मराठी चित्रपट सोहळ्याला उपस्थित राहणार आहेतच पण त्याव्यतिरिक्त चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची ते भेट घेणार आहेत.

बेली यांच्या पत्नी कॅरॉल लिटलटनसुध्दा याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. बेली यांच्या पत्नी या व्यवसायाने फिल्म एडिटर असून त्यांनी ३० हून अधिक चित्रपटांचे एडिटिंग केले आहे. यामध्ये हॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक स्टीवन स्पिलूबर्ग यांच्या गाजलेल्या “Et the extra-terrestrial” या चित्रपटाचाही समावेश आहे.

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे ५६ वे वर्ष आहे. चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. त्याचप्रमाणे व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, राज कपूर विशेष योगदान जीवन गौरव पुरस्कार या सर्वोच्च पुरस्कारांचे वितरणसुध्दा २६ मे रोजी होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील नामंवत अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत.

गेल्या वर्षी ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांना व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, प्रसिध्द दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना राज कपूर विशेष योगदान जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.”
 
“२६ मेला रंगणार पुरस्कार वितरण सोहळा

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content