Homeचिट चॅटबिग बॉसमध्ये आज...

बिग बॉसमध्ये आज ‘लायकी’ काढणार?

बिग बॉस मराठीमध्ये सुरू असलेल्या “करूया आता कल्ला” या टास्कमध्ये काल सुरेखाताईंनी आदिशला सुनावले- तू आता आला आहेस BBमध्ये.. आम्ही जुने आहोत. त्यावरून आदिशला  सुरेखा कुडचींचा प्रचंड राग आला. आणि त्यावरूनच तो आज विशाल, विकास, आविष्कार आणि सोनालीसमोर त्याचं मत मांडताना दिसणार आहे. आता यावरून घरामध्ये अजून कोणता राडा होणार हे आजच्या भागामध्ये कळेलच.

आदिश सुरेखा ताईंनवर आज खूप भडकलेला दिसणार आहे आणि त्याच्या मनातल्या गोष्टी तो विशाल, विकास, आविष्कार आणि सोनालीसमोर सांगणार आहे. आदिश म्हणाला, “आता टास्कमध्ये जास्त मला बोलायचं नाहीये, आता टास्क पहिले होऊन जाऊदे. स्वत:ला जायचं होतं कालपर्यंत बाहेर.. रडारड केली चार दिवस. माझं काय, मला खेळायचं नाही म्हणून.

Thank you नोट देताय का आतापासून… जा.. ना.. मग. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो.. वाईट नका मानून घेऊ. तुमची लायकी काढली आहे सगळ्यांची. तुमची indirectly लायकी काढली. त्यावर सोनाली म्हणते “ती काय लायकी काढणार आमची. विशाल तुलाच का रागाबद्दल बोलला.. दुसरं कोणी रागावलं नाही का यांच्या टीममधलं? हे जे फालतू थिल्लरपणा करतात ते बरोबर आहे का? तुझा राग दिसतो? स्नेहासोबत बरोबर गोडगोड बोलतात… मग”

सोनाली म्हणते, “टॉप ५ मध्ये कोण आहे हे आता ही ठरवणार? आणि कालपर्यंत रडत होती. माझं काही चालणार नाही, हे होणार नाही ते होणार नाही. हा रूल तुम्ही सगळ्यांना दिला का, टॉप ५ कोण आहे हे सांगता?”

बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार आहे कॅप्टन्सी कार्य. ज्यात विशाल, सुरेखाताई आणि स्नेहा हे तीन उमेदवार असणार आहेत. एकीकडे मीरा, जय, गायत्री, उत्कर्ष, दादूस, सुरेखाताई आणि स्नेहा तर दुसरीकडे विशाल, विकास, आदिश, सोनाली, मीनल, तृप्तीताई आणि आविष्कार अशी टीमची विभागणी झालेली दिसणार आहे. जय आणि टीम तर दुसरीकडे, विकास आणि टीम रणनीती आखताना दिसणार आहे.

जय सांगताना दिसणार आहे, “एक समर्थक आणि एक सदस्य जाणार आहे. आता सहा जणांची टीम आहे. म्हणजे सुरेखाताईसाठी तीन आणि स्नेहासाठी तीन सदस्य… आपण एकमेकांशी नाही भांडायचे. जर तुमचे तीन–चार असतील आणि स्नेहाचे नाव फाडलेले असेल तर आम्ही सगळे मिळून तुम्हाला प्रोटेक्ट करणार, पण जर स्नेहाचे तीन–चार असतील तुम्ही सगळ्यांनी तुमचं सोडा आणि स्नेहाची नावे प्रोटेक्ट करा”.

दुसरीकडे, विकास सांगणार आहे, “सामान आणायला जाणार तेव्हा जय आणि उत्कर्ष तुझ्यासोबत असतील. तेव्हा आपण फटाफट इकडे फाडायचे. आपण फाडायला सुरुवात करायची. कारण दोघेही आतमध्ये असणार. या टास्कमध्ये नक्की कोण जिंकणार? कोण कॅप्टन बनणार? जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी.. आज रात्री.. कलर्स मराठीवर. 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content