Homeचिट चॅटअंतराळातही भारताची संघटना!...

अंतराळातही भारताची संघटना! उद्या मोदी करणार उद्घाटन!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 11 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडियन स्पेस असोसिएशन (ISpA), या भारतीय अंतराळ संघटनेचे उदघाटन करणार आहेत. याप्रसंगी ते अंतराळ उद्योगाच्या प्रतिनिधींशीही संवादही साधतील.

भारतीय अंतराळ संघटनेविषयी (ISpA) माहिती

इंडियन स्पेस असोसिएशन (ISpA) ही अंतराळ आणि उपग्रह कंपन्यांची प्रमुख औद्योगिक संघटना असेल, जी भारतीय अंतराळ उद्योग कंपन्यांचा सामूहिक आवाज असेल. ही संस्था उद्योगांना धोरणात्मक समर्थन देईल. सरकार आणि त्याच्या एजन्सीसह भारतीय अंतराळ क्षेत्रातील सर्व हितधारकांशीदेखील ही संघटना समन्वय साधेल. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत, या संकल्पनेच्या अनुषंगाने भारताला स्वयंपूर्ण, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि अंतराळ क्षेत्रातील आघाडीचा देश बनवण्यात, भारतीय अंतराळ संघटना मदत करेल.

अंतराळ आणि उपग्रह तंत्रज्ञानामध्ये प्रगत क्षमता असलेल्या देशी आणि विदेशी कंपन्यांचे भारतीय अंतराळ संघटनेद्वारे प्रतिनिधित्व केले जाणार आहे. संघटनेच्या संस्थापक सदस्यांमध्ये लार्सन अँड टुब्रो, नेल्को (टाटा ग्रुप), वन वेब, भारती एअरटेल, मॅप माय इंडिया, वालचंद नगर इंडस्ट्रीज आणि अनंत टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचा समावेश आहे.

इतर मुख्य सदस्यांमध्ये गोदरेज, ह्यूजेस इंडिया, अझिस्टा-बीएसटी एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड, बीईएल, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स, मॅक्सर इंडिया यांचा समावेश आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content