Homeचिट चॅटनिओ बँक फ्रीओची...

निओ बँक फ्रीओची इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेशी भागीदारी!

भारतातील पहिल्या, पत-अग्रेसर निओ बँकेने इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या सहकार्याने फ्रीओ सेव्ह नावाचे शून्य शिल्लक बचत खाते सुरू करण्याची योजना बाजारात आणली आहे.

संस्थापकांनी यापूर्वी मनीटॅप योजनेद्वारे कर्ज आणि क्रेडिट व्यवसायाला ४४०० कोटींपेक्षा जास्त वितरणासह आर्थिक बळ दिले. आयुष्यभर ग्राहकांच्या आर्थिक प्रवासाच्या प्रत्येक पावलात सक्षमतेने मदत करण्यासाठी वित्तीय उत्पादनांचा एक संच देण्याच्या वचनपूर्तीसाठी फ्रीओ ब्रँडच्या दिशेने ही मोठी झेप गणली जाईल.

फ्रीओ सेव्ह ग्राहकांना माहितीवर आधारित आर्थिक निर्णय घेण्याची आणि या प्रक्रियेत त्यांचे क्रेडिट प्रोफाइल मजबूत करण्याची मुभा देते. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने सुलभ केलेले खाते ७% (१ लाख रुपये आणि त्यापेक्षा जास्त शिल्लक) वर्ग व्याजदराची सर्वोत्तम ऑफर तर देतेच, यासोबतच जागतिक दर्जाची ग्राहकसेवा आणि निधी हस्तांतरण आणि बिल, देयके सुलभ करण्यासाठी युपीआय प्लॅटफॉर्मशी अविरतपणे जोडले गेले आहेत.

फ्रीओचे सहसंस्थापक अनुज कक्कर म्हणाले की, फ्रीओमध्ये, योग्य दिशेने हळुवारपणे पाऊल टाकत आपल्याला पैसे वाचविण्यात, ते हुशारीने खर्च करण्यास आणि वित्तीय सुबत्ता तयार करण्यास कशी मदत करू शकतात हे आम्हाला समजते. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेबरोबर आमचे फ्रीओ बचत खाते सुरू केल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गाकडे अधिक चांगली पावले उचलण्यास मदत होईल.

लोकांना त्यांच्या खर्चाच्या पद्धतींचे विश्लेषण करण्याची आणि लहान पावले उचलण्याची शक्ती आहे. ती त्यांना केवळ थोड्या मदतीने त्यांचे क्रेडिट स्कोअर तयार करण्यास आणि बळकट करण्यास मदत करू शकते. किंबहुना, फ्रीओच्या छताखाली आपली सर्व वैशिष्ट्ये आणि उपाय काळजीपूर्वक हा उद्देश साध्य करण्यासाठी आणि वापरकर्त्यांना भीती न बाळगता खर्च करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या सर्व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना अतिरिक्त सुविधा देण्यासाठी डिझाइन केले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content