Homeकल्चर +राज्य नाट्य स्पर्धेसाठी...

राज्य नाट्य स्पर्धेसाठी पत्रकार संघाकडून ‘ही परी अस्मानीची’!

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‘ही परी अस्मानीची’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे. या नाटकाच्या नाट्यसंहितेचे पूजन लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त व नाटकातील अभिनेते देवदास मटाले, उपाध्यक्ष व अभिनेत्री स्वाती घोसाळकर, नाट्यदिग्दर्शक गुरुदत्त लाड, उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे, कार्यकारिणी सदस्य रजनीश राणे आणि विनोद साळवी उपस्थित होते.

मुंबई मराठी पत्रकार संघाने राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून रंगभूमीवरील आपला प्रवास पुढे सुरू ठेवला असून, यंदा संघाचे हे दुसरे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर होणार आहे.
यावेळी रामशेठ ठाकूर यांनी संघाच्या पहिल्या नाटकाच्या आठवणींना उजाळा दिला. ‘‘मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पहिल्या नाटकाच्या संहितेचे पूजनही माझ्या हस्ते झाले होते. त्या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत दोन पुरस्कार मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या नाटकाकडून आणि कलाकारांकडून त्याहून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे’’, असे ठाकूर यांनी सांगितले.

पत्रकारिता आणि सांस्कृतिक चळवळ यांची सांगड घालत मुंबई मराठी पत्रकार संघ विविध उपक्रम राबवत असल्याचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले. ‘‘राज्य नाट्य स्पर्धेतील मुंबई मराठी पत्रकार संघाचे हे दुसरे नाटक आहे. पहिल्या नाटकाला मिळालेल्या यशाची परंपरा कायम राखत ‘ही परी अस्मानीची’ हे नाटकही सर्व कलाकार तितक्याच ताकदीने सादर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीचे घवघवीत यश

मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध वजनी गटांत १४ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांची, अशी एकूण ३५ पदकांची घसघशीत कमाई केली. १४ आणि १७ वर्षांखालील या दोन...

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...
Skip to content