Homeकल्चर +रविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.

याप्रसंगी त्यांना इशान घोष तबला, सिद्धार्थ मेस्ता संवादिनी तर संदीप मिश्रा सारंगीवर साथ देणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क- ७७००९९४४९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे...

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...

रेल्वे कामगारांचे नेते विकास गुप्ते यांचे निधन

महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे खजिनदार, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार तसेच मणिबेन कारा फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर विकास गुप्ते यांचे आज, ६ जुलै २०२६ रोजी वयाच्या ६५व्या वर्षी कल्याण येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते शेवटच्या श्वासापर्यंत कामगार...
Skip to content