Homeचिट चॅटसाईभक्तांसाठी खूषखबरः श्री...

साईभक्तांसाठी खूषखबरः श्री साईबाबा दैनंदिनी फक्त २५ रूपयांत!

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने प्रकाशित करण्‍यात येणारी “श्री साईबाबा दैनंदिनी २०२१” सर्व साईभक्‍तांकरीता प्रति नग रुपये २५/- या नाममात्र सवलतीच्‍या दरात उपलब्‍ध करुन देण्‍याचा निर्णय संस्‍थानच्‍या तदर्थ समितीने घेतला असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.

संस्थान व्यवस्थापनामार्फत दरवर्षी श्री साईबाबा दैनंदिनी व दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येतात. या विविध प्रकारच्या दैनंदिनी व दिनदर्शिका साईभक्तांना सशुल्क उपलब्ध करुन दिल्या जातात. त्‍यानुसार यावर्षी सन २०२१ची वैशिष्टयपूर्ण श्री साईबाबा दैनंदिनी चार भाषेत (मराठी, हिंदी, इंग्रजी व तेलगू) स्वतंत्र्यरित्या प्रकाशित करण्यात आली आहे. या दैनंदिनीत श्री साईबाबा समाधी मंदिर व मंदिर परिसरातील विविध मंदिरे आणि महत्त्‍वाच्‍या स्थानांची सविस्‍तर मा‍हिती नमूद करण्‍यात आली आहे.

प्रत्‍येक स्थानाच्‍या माहितीसमवेत QR CODE देण्यात आले आहेत. हे QR CODE SCAN केले असता, संबंधित स्थानांची अथवा विभागाची माहिती विविध छायाचित्रांसह दृकश्राव्य पध्दतीने (Video Clip व्दारे) उपलब्ध होते. याव्यतिरिक्त संस्थानमार्फत साजरे होणारे सर्व उत्सव, धार्मिक व इतर कार्यक्रमांची सविस्तर माहिती, संस्थान प्रकाशित पुस्तके / फोटो, ऑनलाईन देणगी, निवासस्थाने व दर्शन आणि आरती नोंदणी करण्याबाबत महत्त्‍वपूर्ण माहितीचा समावेश करण्‍यात आला आहे.

अशाप्रकारे वैशिष्टयपूर्ण असलेली “श्री साईबाबा दैनंदिनी”ची सर्व साईभक्‍तांना २५/- रुपये प्रति नग या नाममात्र सवलतीच्‍या दरात विक्री करण्‍यात येणार असून ही दैनंदिनी समाधी मंदिराशेजारील साई कॉम्‍प्‍लेक्‍स व प्रवेशव्‍दार क्रमांक ०४ येथील पुस्‍तक विक्री काऊंटर, हैद्राबाद येथील माहिती केंद्र व संस्‍थानच्‍या www.sai.org.in या अधिकृत संकेतस्‍थळावर ऑनलाईन विक्रीकरीता उपलब्‍ध असणार आहे. सर्व साईभक्‍तांनी या सवलतीच्‍या दराचा लाभ घ्‍यावा असे आवाहनही बगाटे यांनी केले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content