Homeमाय व्हॉईसमुंबईत रस्त्यावरून सुरक्षितपणे...

मुंबईत रस्त्यावरून सुरक्षितपणे चालायचे आहे, पण कसे?

सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत पायाभूत सेवासुविधांची लक्षणीय भर पडल्याने मुंबई महानगराचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे यात शंका नाही. 2014पूर्वीच्या काळात महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत या क्षेत्रात खूप मागे होता. इतर राज्यातील गुळगुळीत हमरस्त्यांची वाहवा होत असताना पाहवे तिकडे खड्डे हीच आपल्या राज्यातील रस्यांची ओळख बनली होती. अलीकडील काळात परिस्थिती थोडी सुधारली असली तरी आपल्या महामार्गांची कोणी स्तुती करताना दिसत नाहीं. मेट्रो, मोठमोठे रस्ते, उड्डाणपूल, कॉरीडोर, भुयारी रस्ते यांच्या कामावर हजारो कोटी रुपयांच्या खर्चाच्या घोषणा होत असताना मुंबई शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुर्देशेकडे ना महापालिकेचे लक्ष आहे ना सरकारचे. कोणत्याही उपनगरातून हायवेला पोहोचण्यासाठी किमान पाऊण तास लागतो.

कोस्टल रोड-सागरी सेतू काही मिनिटांत पार करून वांद्र्याच्या ONGC जवळ पोहोचल्यानंतर मुंगीच्या गतीने जाणाऱ्या वाहनांना खारचा उड्डाणपूल ओलांडण्यासच किमान चाळीस मिनिटे लागतात. पुढचा अंधेरी, बोरिवलीपर्यंतचा प्रवासही वाहनचालकांची परीक्षा पाहणारा असतो. हायवेवरून एकदाचा उपनगरात प्रवेश केला की सुटलो म्हणावे तर लोकांची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी रिक्षावाले बंधू दबा धरून बसलेले असतात. आपण हात करावा, रिक्षा थांबावी, साहेब कुठे सोडू असे रिकशावाल्याने सौजन्याने विचारावे हे माझे स्वप्न आयुष्यात एकदा तरी पूर्ण

मुंबई

व्हावे अशी इच्छा आहे. पण ते कधीच पूर्ण न करण्याचा उपनगरातील, विशेषत: पार्ल्यातील रिक्षावाल्यांनी पण केला असावा. भाडे कसे नाकारावे या विषयात बहुदा त्यांनी पीएचडी केली असावी. त्याहीपेक्षा, रिक्षा परवाने हजारोंच्या संख्येत परप्रांतियांना वाटणारे सरकार आणि वाहतूक पोलीस रिक्षवाल्यांच्या अरेरावीपुढे नेहमीच नांगी का टाकतात हे न उलगडणारे कोडे आहे.

उपनगरातील रस्ते खड्यानी भरलेले, फुटपाथ फेरीवाल्यांचे, रिक्षा मिळत नाहीत, बेस्टचे बारा वाजलेले.. तुफान पाऊस पडून रस्ते जलमय झाल्यावर ‘शक्यतो घराबाहेर पडू नका’ असा जो सल्ला दिला जातो तो आता पावसाळा नसतानाही, रोजच देण्याची वेळ आहे. देशाची राजधानी भीषण वायूप्रदूषणाच्या संकटात सापडली आहे. शाळा, कार्यलये पुन्हा घरून सुरु झाली आहेत. मुंबईत अद्यापतरी प्रदूषणाची गंभीर समस्या नसली तरी वाहतूक प्रदूषण प्रचंड वाढले आहे. पाहवे तिकडे वाहतूककोंडीने लोक हैराण झाले आहेत. रस्त्यावरून सुरक्षितपणे पायी चालण्याच्या आपल्या मूलभूत नागरी हक्काचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी जागरूक होण्याची वेळ आता निश्चितच आली आहे. जाता जाता या संदर्भातील यू ट्यूबवरील “The Unwalkeble India” हा एक चांगला व्हिडीओ पाहण्याची शिफारसही करू इच्छितो. त्यात आपल्या शहरांच्या सद्यस्थितीचे वास्तव आणि विदारक चित्रण पाहावयास मिळेल.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व दैनिक लोकसत्ताचे मुंबईचे निवृत्त निवासी संपादक आहेत.)

Continue reading

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार असलेला त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प येत्या मंगळवारी संसदेत सादर होणार आहे. आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी आंध्र प्रदेश आणि बिहार राज्यांना विशेष मदत दिली जाईल का तसेच पुढील...

निर्मला सीतारामन आज सर्वसामान्यांना दिलासा देणार?

अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत आज सादर होणाऱ्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे समस्त देशवासियांचे डोळे लागले आहेत. पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने यंदाच्या पूर्ण अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्यांना निश्चितच काही दिलासा देतील, अशी अनेकांची अटकळ आहे. त्यातही, मीही मध्यमवर्गीयच...

‘झोमॅटो’पाठोपाठ ‘ग्लेनमार्क’चा आयपीओही ‘घबाड परंपरा’ राखेल?

झोमॅटोचा आयपीओ आज लिस्ट झाला. गुंतवणूकदारांना अपेक्षेप्रमाणे घसघशीत  सुमारे ८० टक्के इतका परतावा मिळवून देणाऱ्या झोमॅटोपाठोपाठच येत्या २७ जुलै रोजी खुली होणारी ग्लेनमार्क लाईफसायन्सेसची प्रारंभिक समभाग विक्रीही (आयपीओ) तसाच चर्चेचा विषय बनली आहे. हा आयपीओही गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून देणार...
Skip to content