Homeकल्चर +डॉ. मेहरा श्रीखंडे...

डॉ. मेहरा श्रीखंडे लिखित ‘ऊर्जेचे गूढ विश्व’चे शानदार प्रकाशन

डॉ. मेहरा श्रीखंडे लिखित ‘मिस्टिक वर्ल्ड डिकोडेड’ या इंग्रजी आणि त्याच्या ‘ऊर्जेचे गूढ विश्व’, या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन लोकमान्य रुग्णालयाचे चेअरमन व संचालक डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या हस्ते मुंबईतल्या एका शानदार सोहळ्यात करण्यात आले. मराठी पुस्तकाचा अनुवाद मुंबईस्थित पत्रकार अशोक शिंदे यांनी केला आहे. दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन स्नेहल सिंग यांच्या माईंड स्पिरिट वर्क्स या संस्थेने केले आहे.

ऊर्जा शास्त्र अनेकदा वैद्यकीय क्षेत्रालादेखील अचंबित करते. अनेक परिणामकारक कृती घडताना या ऊर्जेचे अस्तित्त्व मानवी जीवनात निश्चित असते, असा विश्वास बसू लागतो. त्यामुळे या शास्त्रालादेखील समजून घेतले पाहिजे, असे विचार डॉ. नरेंद्र वैद्य यांनी व्यक्त केले. विश्वातील विविध स्वरुपात असलेल्या ऊर्जेचे महत्त्व तसेच त्या ग्रहण करून आपले जीवन सकारात्मक करण्याच्या दृष्टीने वाटचाल कशी करता येईल, याबाबतचे मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे. तसेच जगभरातील विविध संस्कृती तसेच परंपरांमध्ये असलेल्या ऊर्जा ग्रहण पद्धतींचाही त्यात समावेश केला गेला आहे. कबाला, देवदूतांचे अंक, बाख फ्लावर थेरपी, नाद चिकित्सा, गंध चिकित्सा, मंत्र, योग, हिलिंग, क्वांटम थेरपी अशा अनेक पद्धतींना या पुस्तकातून समजावून देण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. मेहरा श्रीखंडे यांनी सांगितले. 

विश्वाची प्रारंभिक भाषा ही ऊर्जा आहे. प्रत्येकातून मिळालेल्या ऊर्जेतून मनुष्य आणि सजीव सृष्टी ऐकमेकांना समजून पुढची वाटचाल करू शकली, त्याचबरोबर हे शास्त्र देश-विदेशात वेगवेगळ्या पद्धतींनी रुजले आहे, त्याचा आढावा अशोक शिंदे यांनी यावेळी घेतला तसेच विज्ञान आणि विविध संस्कृतींमधील दाखलेही त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून दिले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

नंदुरबारमधल्या रानफुलांचा चहा प्या मुंबईत!

मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या महानगरांत रहाणाऱ्या नागरिकांना आदिवासी लोक, त्यांची संस्कृती, त्यांची खाद्यसंस्कृती यांविषयी कायमच एक कुतूहल असते. जेव्हा ही संस्कृती अनुभवायला मिळते, तेव्हा तो शहरी नागरिकांसाठी एक विलक्षण अनुभव असतो. हाच विलक्षण अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे उद्या, २२ आणि रविवारी, २३ नोव्हेंबरला!...

भारताच्या सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी व्हायचंय…

भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारीपदाकरीता होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे प्रशिक्षण होणार असून प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास...

‘हॅपी बर्थडे’, ‘कडाल कण्णी’ही ठरणार ‘इफ्फी’चे एक आकर्षण!

गोव्यात आजपासून सुरू होत असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील बाल्यावस्थेतील धैर्य, सर्जनशीलता आणि स्वप्नांचा शोध घेणाऱ्या पाच चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे. यावेळी इफ्फी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र बालक निधी (युनिसेफ)बरोबर भागीदारी करणार असून चालत्या-बोलत्या, आव्हान देणाऱ्या...
Skip to content