Homeकल्चर +१४ नोव्हेंबरपासून मुंबईत...

१४ नोव्हेंबरपासून मुंबईत वार्षिक संगीत महोत्सवाची मेजवानी

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात एक संगीत महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी हा महोत्सव १४, १५ आणि १६ नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.

महोत्सवाचा प्रारंभ १४ नोव्हेंबरला सुप्रसिद्ध सरोदवादक पं. तेजेंद्र नारायण मजुमदार यांच्या सरोदवादनाने होईल. त्यांना तबल्याची साथ पं. योगेश सम्सी यांची आहे. १५ नोव्हेंबरला जयपूर घराण्याचे नामवंत गायक पं. रघुनंदन पणशीकर यांचे गायन होईल. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि हार्मोनियमवर अमेय बिचू साथ करतील. १६ नोव्हेंबर रोजी संगीत महोत्सवाचा समारोप सुविख्यात गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल. त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवलकर आणि हार्मोनियमवर अनंत जोशी साथ देतील.

हे सर्व कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले  वातानुकूलीत सभागृहात रोज संध्याकाळी पाच वाजता सुरू होतील. हा संगीत महोत्सव विनाशुल्क असून गानरसिकांना आसनमर्यादेमुळे प्रथम येणाऱ्या प्राधान्य यानुसार प्रवेश मिळेल. तरी रसिकांनी या मैफलींचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content