Homeचिट चॅटसेलिब्रिटीजना वाढदिवसाच्या शुभेच्छा...

सेलिब्रिटीजना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या ‘हिपी’च्या खास फिचरने!

चाहत्यांच्या मनोरंजनाचा विषय निघतो, तेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटी कोणतीही कसर सोडत नाहीत. सुपर हॉट डान्स नंबर, जबरदस्त अॅक्शन थ्रिलर, आरामदायी सुरावट आणि सुंदर लव्ह ट्रॅक्सद्वारे सेलिब्रिटी आपल्या मनावर राज्य करतात. चाहतेदेखील त्या प्रेमाचा परतावा अनेक पटींनी करतात. विशेषत: सेलिब्रेटींच्या वाढदिवसाला. याच कल्पनेतून हिपी, या भारतातील वेगाने वाढणाऱ्या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मने बी टाऊन स्टार्सचे वाढदिवस स्वॅग आणि स्टाइलने साजरे करण्यासाठी मनोरंजक उपक्रम राबवले आहेत.

मिकासारख्या संगीतातील दिग्गजापासून ते रणवीर सिंगसारख्या गली बॉयपर्यंत क्रिएटर्स त्यांच्या पसंतीच्या बॉलिवूड सेलिब्रेटीचा वाढदिवस साजरा करू शकतात. यावेळी ब्लॉकबस्टर मूव्हिजमधील एपिक सीन तयार करणे, डायलॉग किंवा डान्स मूव्ह/हूक स्टेप तयार करणे इत्यादी फन चॅलेंजमध्ये त्यांना भाग घेता येऊ शकतो.

बी-टाऊनच्या हॉट सेन्सेशन आणि ‘नॉक-नॉक’ विनोदांचे प्रशंसक, सारा अली खान आणि भारताचे आवडते विनोदी कलाकार जॉनी लीव्हर ऑगस्टमध्ये येतील. क्रिएटर्स ‘हॅपी बर्थडे’ फिल्टर वापरून तसेच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या (कुली नं १, केदारनाथ आणि दीवाना मस्ताना) प्रसिद्ध चित्रपटांतील ऑडिओ ट्रॅक आणि क्लिपिंग वापरत आनंददायी व्हिडिओ रेकॉर्ड करून यांना शुभेच्छा देऊ शकतात.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content