पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या जांभे ग्रामपंचायतीत असलेल्या लाईफ रिपब्लिक टाऊनशिपमधील रहिवाशांकडून उद्यापासून म्हणजेच येत्या 22 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लाईफ रिपब्लिकमधील अग्निशमन केंद्राच्या बाजूला असलेल्या ए-३ येथील मैदानात यानिमित्ताने गरबा तसेच इतर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवात विविध क्षेत्रातल्या नामावंत कलाकारांकडून त्यांची कला सादर केली जाणार आहे. डीजे आणि त्यानुसार प्रकाशयोजना, नारीशक्ती सन्मान, महाआरती असे कार्यक्रम रोजच्या रोज आयोजित केले जातील. याखेरीज दोन ऑक्टोबरला रावणदहन तसेच गंगाआरती होणार आहे. उत्कृष्ट कला सादर करणाऱ्या पुरुष, महिला, जोडी तसेच समूह, या सर्वांना रोजच्यारोज बक्षिसे दिली जाणार आहेत. या कार्यक्रमात सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, पोलीस बंदोबस्त तसेच महिला बाउन्सर्स तैनात करण्यात येणार आहेत. तरी जास्तीतजास्त लोकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन नवरात्र महोत्सव साजरा करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान, या नवरात्रौत्सवाच्या जागेचे भूमिपूजन, भारतीय जनता पार्टीच्या नमो नमो संस्थेच्या प्रदेश उपाध्यक्षा नीती सिंग, युवा नेता अनुप गायकवाड, उद्योजक नागेश गायकवाड, विजय गायकवाड आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. अनुप गायकवाड यांच्या मातोश्री जांभे गावाच्या पहिल्या महिला सरपंच होत. त्यांचे वडील विजय गायकवाड हेदेखील सामाजिक कार्यकर्ते आहेत.
वाह! मस्त!