मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५, यादिवशी सकाळी ९.३० वाजता तबलावादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहे. स्पर्धा १६ ते २५ वर्षे या मोठ्या वयोगटासाठी ९.३० वाजता तर १० ते १५ वर्षे, या छोट्या वयोगटासाठी दुपारी ३ वाजता होईल.
अधिकाधिक स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा- ०२२-२४३०४१५०, www.dadarmatungaculturalcentre.org