Homeहेल्थ इज वेल्थव्हाईट लोटस हॉस्पिटलतर्फे...

व्हाईट लोटस हॉस्पिटलतर्फे रविवारी मोफत तपासण्या शिबीर

सणासुदीच्या मोसमाच्या निमित्ताने नवी मुंबईत आरोग्यविषयक सर्वात मोठी तसेच व्यापक मोहीम सुरू करताना कळंबोली येथील व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे येत्या रविवारी, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विविध स्वरूपाच्या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल, रोडपाली रोड, कळंबोली, नवी मुंबई येथे हे शिबीर होईल. मधुमेह आणि लठ्ठपणा नजरेसमोर ठेवून या तपासण्या केल्या जाणार आहेत.

या शिबिरात रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक तथा ख्यातनाम क्रिटीकल केअर एक्स्पर्ट डॉ. विजय डिसिल्वा, डॉ. प्रशांत गायकवाड (एन्डोक्राइनॉलॉजी डायबेटोलॉजी), डॉ. रवी पाटील (इंटरनल मेडिसीन), डॉ. आदित्य नायक (नेफ्रोलॉजी), डॉ. सचिन नाईक (नेफ्रोलॉजी), डॉ. सुहास देशपांडे (नेत्ररोगतज्ज्ञ) यांच्या देखरेखीखाली या तपासण्या होऊन रूग्णांना मोफत वैद्यकीय सल्लाही दिला जाणार आहे. फायब्रो स्कॅन, लिपिड प्रोफाईल, एचबीएवनसी (HbA1c), क्रिएटिनीन आणि डोळ्यांची तपासणी, अशा पाच हजार रुपयांपर्यंतच्या मूल्याच्या तपसण्या मोफत केल्या जाणार आहेत.

इच्छुकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेण्यासाठी लगेचच ८८७९३०७९३० किंवा १८००३१३८९९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. विजय डिसिल्वा यांनी केले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content