Homeचिट चॅटसानिया मिर्झाने घेतला...

सानिया मिर्झाने घेतला फिटनेस व योगाचा मास्टरक्लास!

के-१२ विभागामधील एडटेक प्रमुख लीडने भारतभरातील त्‍यांच्‍या सहयोगी शाळांच्‍या ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्‍यांसाठी दुसरा मास्‍टरक्‍लास (Masterclass) नुकताच सुरू केला. याअंतर्गत पद्मभूषण पुरस्‍कारप्राप्‍त सानिया मिर्झा, विद्यार्थ्‍यांना फिटनेस व योगाच्‍या माध्‍यमातून आरोग्‍यदायी जीवनशैली अवलंबण्‍यास प्रेरित करत आहे.

टेनिस चॅम्पियन सानिया मिर्झाने कमी झालेली शारीरिक हालचाल व चिंता या समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांना शारीरिक व मानसिक व्‍यायामाचे महत्त्व सांगितले.

मास्‍टरक्‍लाससह लीडने प्रख्‍यात तज्ज्ञांसोबत सहयोग करत शालेय विद्यार्थ्‍यांना सर्वांगीण विकास व वाढीचे महत्त्व पटवून देण्‍याकरिता उद्योगक्षेत्रातील पहिला उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्‍यांना तज्ज्ञांकडून त्‍यांचे ज्ञान व अनुभवाची माहिती मिळते. या उपक्रमापूर्वी लहान शहरांमधील विद्यार्थ्‍यांना अशा प्रकारच्‍या संधी उपलब्‍ध नव्‍हत्‍या. सर्जनशील लेखनावरील पहिला मास्‍टरक्‍लास प्रख्‍यात लेखक चेतन भगत यांनी घेतला होता.

स्‍पोर्टस् आयकॉनसोबतचा फिटनेस व योगावरील मास्‍टरक्‍लास विद्यार्थी व त्‍यांच्‍या पालकांसाठी सुखद अनुभव देणारा होता. या मास्‍टरक्‍लासमध्‍ये सानियाने तंदुरूस्‍त राहण्‍यासाठी अंतर्गत शक्‍ती निर्माण करण्‍यासोबत स्‍नायूंना बळकटी देणे हा मंत्र सांगितला. काहीही करून स्‍वप्‍ने साकारण्‍यावर प्रबळ विश्‍वास असलेल्‍या सानियाने विद्यार्थ्‍यांना जीवनात शिस्तीचे महत्त्व स्‍पष्‍ट केले. आपण क्रीडा व शिक्षण या दोन्‍ही क्षेत्रांमध्‍ये कशाप्रकारे यशस्‍वी कामगिरी केली याबाबतदेखील माहिती तिने दिली.

आपली स्‍वप्‍ने साकारण्‍याच्‍या आपल्‍या कटिबद्धतेच्‍या मार्गात महामारीचा अडथळा येता कामा नये. फिटनेस व योगा आजच्‍या मुलांसाठी त्‍यांचे मानसिक व शारीरिक आरोग्‍य प्रबळ करण्‍याचे उत्तम मार्ग आहेत. सर्वांगीण विकास व शिक्षणासाठी आरोग्‍यदायी शरीर व मन आवश्‍यक आहे. सद्यस्थितीमध्‍ये शाळांनी विद्यार्थ्‍यांना या संधी देणे महत्त्वाचे आहे, असे ती म्हणाली.

लीडचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुमीत मेहता म्‍हणाले की, मास्‍टरक्‍लास लहान नगरांमधील विद्यार्थी व शाळांना उपलब्‍ध होऊ न शकणारे विश्‍व उपलब्‍ध करून देते. प्रत्‍येक मुलाला दर्जेदार शिक्षण किफायतशीररित्‍या उपलब्‍ध करून देण्‍याचे आमचे मिशन आहे. अन्‍यथा मुलांना चेतन भगत किंवा सानिया मिर्झा यांच्‍या लाइव्‍ह क्‍लासला उपस्थित राहण्‍याची संधी कशी मिळणार? लहान नगरांमधील मुलांना दर्जेदार शिक्षण व संधी दिली तर ते मेट्रोंमधील विद्यार्थ्‍यांप्रमाणे आपली चमक दाखवू शकतात.

दर महिन्‍याला लीडच्‍या मास्‍टरक्‍लासमध्‍ये कौशल्‍य आधारित थीम्‍स आहेत. योगा, सार्वजनिक चर्चा, बौद्धिक गणित इत्‍यादी. प्रत्‍येक सत्रामध्‍ये प्रेरणादायी कथा, सेलिब्रिटी व शिक्षकांसोबत लाइव्‍ह प्रश्‍नोत्तरे, कोड्यांच्‍या स्‍वरूपात सहभाग, चर्चासत्रे, लाइव्‍ह धमाल उपक्रम आणि अभ्‍यासामध्‍ये गुंतवून ठेवण्‍यासाठी गृहपाठ यांचा समावेश असेल.

एडटेक (एज्‍युटेक) कंपनी लीडरशीप बोलवर्डने लीडचे प्रमोशन केले आहे. ते अध्‍यापन व अध्‍ययनाच्‍या एकीकृत यंत्रणेमध्‍ये तंत्रज्ञान, अभ्‍यासक्रम व अध्‍यापनाचा समावेश करतात. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे अध्‍ययन व शिक्षकांच्‍या अध्‍यापनामध्‍ये सुधारणा होते. लीडचा २० राज्‍यांमधील द्वितीय ते चतुर्थ श्रेणीच्‍या शहरांसह ४००हून अधिक शहरांमधील २०००हून अधिक शाळांसोबत सहयोग आहे. त्यामधून अंदाजे ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्‍यांना शिक्षण दिले जाते.    

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content