Homeन्यूज ॲट अ ग्लांसआज संध्याकाळी होणार...

आज संध्याकाळी होणार दिल्लीचा मुख्यमंत्री जाहीर!

राजधानी दिल्लीचा मुख्यमंत्री कोण हे आज संध्याकाळी सात वाजल्यानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री असणार की नाही, हेही स्पष्ट होणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता भाजपाच्या दिल्ली विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे. यात ओपी धनखड तसेच रविशंकर प्रसाद भारतीय जनता पार्टीचे पर्यवेक्षक म्हणून सहभागी होतील. आमदारांच्या या बैठकीतच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून आलेल्या नावावर आमदारांकडून शिक्कामोर्तब केले जाईल. उद्या दुपारी १२ वाजता प्रसिद्ध रामलीला मैदानावर दुपारी साधारण साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल.

पाच फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभेसाठी मतदान झाले. आठ फेब्रुवारीला मतमोजणी झाली. तेव्हा ७० जागांच्या विधानसभेत भाजपाला ४८ जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित केले नव्हते. आज सकाळी पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत काही नाव शॉर्टलिस्ट करण्यात आली. याच बैठकीत पक्षाचे केंद्रीय निरीक्षकही निश्चित करण्यात आले. दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांच्याबरोबर चर्चा झाली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे समजते. संध्याकाळी होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत या नावाला औपचारिक मान्यता दिली जाईल.

दोन दिवसांपूर्वीच नड्डा यांनी दिल्लीतल्या काही आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. भाजपाच्या साधारण दहा आमदारांना त्यांनी या चर्चेसाठी बोलावले गेले होते. यामध्ये भाजपाचे दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, अरविंद सिंग लवली, शिखा राय, अजय महावर, रेखा गुप्ता, अनिल कुमार शर्मा, डॉ. अनिल गोयल यांचा समावेश होता. विजेंद्र गुप्ता रोहिणी मतदारसंघातून सतत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. सतीश उपाध्याय यांनी आम आदमीचे पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांचा पराभव केला आहे. अरविंदर सिंग लवली काँग्रेसच्या शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात चार वेळा मंत्री राहिलेले आहेत. शिखा राय, दिवंगत भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात. सौरभ भारद्वाज, हे आम आदमी पार्टीचे नेते त्यांच्याकडून पराभूत झाले आहेत. अजय महावर धोंडा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. रेखा गुप्ता भाजपाच्या महिला विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. अनिल कुमार शर्मा हेही भाजपाचे दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.

भाजपा अध्यक्षांनी या आमदारांशी जरी स्वतंत्रपणे चर्चा केली असली तरी या नेत्यांपैकी एकाच्याही गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार नसल्याचे जाणकारांनी सांगितले. या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे प्रमुख संयोजक, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नई दिल्ली मतदारसंघातून पराभूत करणारे प्रवेश वर्मा ही भाजपाची पहिली पसंत ठरू शकते. प्रवेश वर्मा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे चिरंजीव आहेत. 2013पासून या परिसरातून ते सतत दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. नवी दिल्लीची त्यांना चांगली जाण असून केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या आमदारांना व्यवस्थितपणे तोंड देण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे बोलले जाते. जितेंद्र महाजन हे आणखी एक आमदार भाजपाचे आहेत जे रोहतास नगर येथून सतत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते निकटवर्तीय मानले जातात. जर संघाने त्यांच्या नावाचा आग्रह धरला तर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नावही निश्चित होऊ शकते. भाजपाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांच्या नावाचीही चर्चा दिल्लीत होत आहे. मात्र या निवडणुकीत ते स्वतः निवडणूक लढले नाहीत. त्यांनी फक्त पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी मेहनत घेतली. याचे बक्षिस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपदाची जागा दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. परंतु सूत्रांच्या मते, त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन पक्षसंघटनेवरील अंकुश कमी करणे भाजपाला तितकेसे मानवणार नाही. त्यामुळे त्यांना इतर कोणत्यातरी मार्गाने समाधानी केले जाईल.

Continue reading

हरमित सिंग ठरला ‘खासदार श्री’चा किंग!

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली लाख मोलाच्या बक्षिसांची उधळण, यामुळे ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धे’ने...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली...

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...
Skip to content