Homeकल्चर +"देवमाणूस"मध्ये पहिल्यांदाच झळकणार...

“देवमाणूस”मध्ये पहिल्यांदाच झळकणार महेश-रेणुकाची जोडी!

काय ऐकलात का? मराठी चित्रपटसृष्टीतील दोन सर्वात प्रतिष्ठित कलाकार आपल्या सर्वांचे आवडते म्हणजेच महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे, त्यांच्या तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत प्रथमच एका आगामी मराठी चित्रपट “देवमाणूस”साठी एकत्र येत आहेत.

वास्तव, नटसम्राट आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यासारख्या चित्रपटांतील आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते महेश मांजरेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा चांगलाच उमटवला आहे. इंटेन्स ड्रामाने भरपूर अशा भूमिकांपासून ते पावरफुल ॲक्शनपॅक्ड व्यक्तिरेखा साकारत महेशजींनी मनोरंजन विश्वात सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्यांपैकी एक अशी आपली जागा बनवली आहे. दुसरीकडे अभिनेत्री रेणुका शहाणे, हम आपके है कौन, अबोली, जानिवा यासारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभूतपूर्व भूमिकांमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेची शोभा वाढवली आहे. टीव्ही आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात दमदार कारकीर्दीसह, त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

अभिनेते महेश मांजरेकर ह्यांनी ह्या सिनेमाबद्दल आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “देवमाणूससारख्या चित्रपटामध्ये रेणुकासोबत काम करणे हा माझासाठी एक खूप बहुप्रतिक्षित सर्जनशील प्रवास वाटतो. मी सध्या या नव्या ऑन-स्क्रीन भागिदारीबद्दल खूप जास्त उत्साहित आहे आणि आशा करतो की आपले प्रेक्षकसुद्धा आमच्या या नव्या जोडीसाठी असाच उत्साह दाखवतील.”

अभिनेत्री रेणुका शहाणे म्हणाल्या की, “देवमाणूसच्या निमित्ताने मी महेशसोबत जरी पहिल्यांदा काम करत असले तरी आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतोय. त्यामुळे असं वाटलंच नाही की आम्ही यापूर्वी एकत्र काम केल नाहीये. मला खात्री आहे ‘देवमाणूस’ बघून प्रेक्षकांना काहीतरी दमदार बघितल्याचं समाधान मिळेल. खूप वर्षांनी मला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळालीये, त्याचा विशेष आनंद होतोय.”

बहुचर्चित तेजस प्रभा विजय देवस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट, रकुल प्रीत सिंगसोबत छत्रीवाली यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. “देवमाणूस” सिनेमात दिग्गज कलाकार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे एका वेगळ्याच भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत, जे प्रेक्षकांसाठी पूर्णपणे नवीन अनुभव असणार आहे. दोन्ही कलाकारांचे जबरदस्त अभिनयकौशल्य प्रदर्शित करण्याचे वचन हा आगामी मराठी चित्रपट देणार आहे. या अभिनेत्यांचे चाहते एका अविस्मरणीय अनुभवाची वाट पाहू शकतात, जिथे महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी आणि त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री हे मुख्य आकर्षण असेल. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट प्रेक्षकांकरीता एक जबरदस्त मेजवानी ठरणार आहे.

Continue reading

व्हाईट लोटस हॉस्पिटलतर्फे रविवारी मोफत तपासण्या शिबीर

सणासुदीच्या मोसमाच्या निमित्ताने नवी मुंबईत आरोग्यविषयक सर्वात मोठी तसेच व्यापक मोहीम सुरू करताना कळंबोली येथील व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे येत्या रविवारी, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विविध स्वरूपाच्या मोफत तपासणी शिबिराचे...

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...
Skip to content