Tuesday, January 28, 2025
Homeटॉप स्टोरीनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

सोबत: जिल्हानिहाय तक्ता

आचारसंहिताभंगाच्या ३११२ तक्रारी निकाली

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२४ या काळात राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर आचारसंहिताभंगाच्या एकूण ३१२८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३११२ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने दिली आहे.

नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिताभंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येते.

Continue reading

पंकज त्रिपाठींना अनुभवा अपनी ‘कहानी का हीरो’मध्ये!

डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमधील आघाडीची कंपनी प्रोटीअन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लि. NSDL eGovते Proteanअशी संस्थेची नवीन ओळख निर्माण करण्याच्या मार्गावर आहे. नुकतीच त्यांनी त्यांची नवीन ब्रँड मोहीम, अपनी कहानी का हीरो लाँच केली आहे. कंपनीने नागरिकांचे जीवन कसे उंचावते हे दाखवण्यासाठी भारतातील सामान्य माणसाचे प्रतीक...

आता स्वप्नातले घर शोधा ‘थ्रीडी’मध्ये!

हाऊसिंग डॉटकॉमने त्यांच्या ग्राहकांसाठी घरखरेदीचा अनुभव अधिक सुलभ करताना नेक्स्ट-जेन थ्रीडी, एआर आणि व्हीआर इनोव्हेशन्ससह व्हिज्युअलाइझेशनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हाऊसिंग डॉटकॉम या भारताच्या आघाडीच्या रियल इस्टेट अॅपने एक दशकापूर्वी थ्रीडी, ऑग्मेन्टेड रियालिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रियालिटी (व्हीआर) टूल्स...

अमर हिंद मंडळ कबड्डीः विजय क्लब, शिरोडकर महिला संघ विजेते

मुंबईत २१ ते २५ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अमर हिंद मंडळ कबड्डी स्पर्धच्या किशोर गटात दादरच्या विजय क्लबने बाजी मारली. महिला गटात डॉ. शिरोडकर महिला संघ विजेता ठरला. मुंबई शहर जिल्हा कबड्डी असोसिएशनने मान्यता दिलेल्या या स्पर्धेत मुंबईतील एकूण...
Skip to content