Thursday, November 7, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटश्री महालक्ष्मीचा महिमा...

श्री महालक्ष्मीचा महिमा सांगणारी ‘नारायणी’..

नारायणी, हा लेखक किशोर दीक्षित यांनी लिहिलेला लघुग्रंथ नुकताच हाती पडला आणि जाणून घेतले त्याविषयी..

आद्यन्तरहितेदेवी ह्यादिशक्ती खगोचरे। 

योगिनी योगसंभूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।। 

लेखक किशोर दीक्षित आपल्या मनोगतात लिहितात-

आज ‘नारायणी’ हा लघुग्रंथ आपल्या हाती देताना मनास खूप आनंद व समाधान वाटत आहे. श्री महालक्ष्मीचा कृपाप्रसाद, आईवडिलांचे आशीर्वाद यामुळेच हा ग्रंथ प्रकाशित होण्याचे भाग्य मला लाभले.

गेली अनेक वर्षे बँकेच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी मंदिरात भक्तांची अल्पशी सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. गेल्या दहा वर्षांत किमान दहा लाख भक्तांशी कमीअधिक प्रमाणात संवाद साधता आला. येणारे भक्त विविध प्रांतांतील, विविध भाषा बोलणारे, अनेक क्षेत्रांत कार्यरत असलेले, विविध जाती-पंथांचे, निरनिराळ्या आर्थिक स्तरांवरचे, विविध वयोगटांतील होते. भक्तांच्या मांदियाळीत मला जे सर्वांना एकत्र बांधू शकते ते एक समान सूत्र आढळले आणि ते सूत्र म्हणजे जगदंबेवरील निस्सीम भक्ती. श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्याचे विविध पैलू मला जवळून पाहावयास मिळाले. या श्रद्धेची अनुभूती माझ्यासाठी एक विलक्षण समृद्ध शिदोरी होती. ही आनंदयात्रा शब्दातीत होती.

ज्ञात-अज्ञात अशा महालक्ष्मी भक्तांच्या श्रद्धेमुळे मला ‘नारायणी’ ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मिळाली. या असंख्य भक्तांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे मी माझे परमकर्तव्य समजतो.

‘नारायणी’ ग्रंथ ज्या क्षणी आपल्या हाती आला त्या क्षणापासून आपल्या भाग्योदयास प्रारंभ झाला आहे असे समजावे. ‘नारायणी’ ग्रंथाचे मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत अवलोकन केल्यास दक्षिण काशीचे दर्शन घडेल व श्री महालक्ष्मीस प्रदक्षिणा घातल्याचे समाधान मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूक्त, स्तोत्र, सहस्रनामावली, अष्टकम, कवच अथर्वशीर्ष याच्या नित्य पठणाने, देवी उपासनेने ‘श्री’ कृपेचा स्पर्श आपणास जाणवेल. प्रभावी अशा सूक्त, स्तोत्र, मंत्र, नामसंकीर्तनाने आपले भाग्य उजळणार आहे. नित्य उपासना, पठण व निष्काम भक्तीचे सातत्य ठेवल्यास श्री महालक्ष्मीची कृपा आपणावर व आपल्या परिवारावर सदैव अखंडपणे राहणार आहे, असा विश्वास मनात कायम नंदादीपाप्रमाणे तेवत ठेवावा.

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या माहात्माविषयी, तिच्या थोरवीविषयी मी काही लिहावे, अशी माझी कणमात्र पात्रता नसताना आई जगदंबेने मजकडून हे करवून घेतले, या जाणिवेने व कृतज्ञतेने अंतःकरण दाटून आले आहे.

पुस्तकात देवीचे माहात्म्य, स्थापत्य, उत्सव, यात्रा, उपासना आणि श्री यंत्र अशा विविध विभागांमध्ये श्लोक आणि रंगीत छायाचित्रांच्या उत्कृष्ट छपाईसहित माहिती दिली आहे.

॥नारायणी॥

लेखक: किशोर दीक्षित प्रकाशक: विवेक प्रकाशन

मूल्य: ६००/- रुपये

नारायणी

पुस्तक खरेदीसाठी संपर्क- ग्रंथ संवाद वितरण (8383888148)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात का?

तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात का? तुम्ही तुमच्या उद्देशाच्या दिशेने यात्रा करत आहात की त्यापासून दूर जात आहात? तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात ते तसंच चालू ठेवून तुम्हाला स्वतःविषयीची हीच कथा चालू ठेवायची आहे की तुम्हाला वेगळ्या भवितव्याची अपेक्षा...

जाणून घ्या इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा!

इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा, हे लेखक सुरेश नाईक यांचे विज्ञान पुस्तक. सचित्र वाचनीय असलेले हे पुस्तक  आर्ट पेपरवर छापलेले आहे. लेखक सुरेश नाईक यांनी या पुस्तकाबद्दल आपली भूमिका मांडली आहे. त्यातील काही भाग इथे देत आहोत. 'चंद्रयान-३'चे यश अतिशय गौरवास्पद होते आहे. याची...

वाचा एका सामान्य शिक्षिकेचे शाळेतले प्रयोग!

'माझे शाळेतले प्रयोग' हे पहिली ते चौथीच्या वर्गास शिकवणाऱ्या एका सामान्य शिक्षिकेचे शैक्षणिक प्रवासवर्णन आहे. या पुस्तकाच्या लेखिका स्मिता गौड यांनी जिल्हा परिषद शाळेत २४ वर्षे अध्यापनकार्य केले.‌ त्यानंतर त्या प्रशासकीय सेवेत अधिकारी पदावर रुजू झाल्या. त्यांचा हा प्रवास...
Skip to content