Homeएनसर्कलमुथूट फिनकॉर्पची व्यापाऱ्यांसाठी...

मुथूट फिनकॉर्पची व्यापाऱ्यांसाठी नवी योजना

व्यापारी समाजाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करणाऱ्या, 137 वर्षे जुन्या मुथूट पप्पाचन ग्रुप (मुथूट ब्लू)ची प्रमुख कंपनी, मुथूट फिनकॉर्प लिमिटेडने व्यापारी विकास गोल्ड लोन ,ही एक नवीन योजना सादर केली आहे. व्यापाऱ्यांना भरपूर लवचिकता आणि मूल्य प्रदान करणारी ही नावीन्यपूर्ण ऑफर व्यापाऱ्यांच्या विकसनशील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठीच तयार केली आहे.

जास्तीतजास्त कर्ज मिळविण्यासाठी व्यापारी त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचा उपयोग करू शकतात. यामुळे त्यांच्या व्यवसायाला पाठबळ तर मिळेलच, पण व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक निधीही उपलब्ध होईल. या योजनेत 7 दिवसांपासून ते 12 महिन्यांपर्यंत मुदतीची पुरेशी लवचिकता आहे. यामुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याची संधी मिळते.

व्यापाऱ्यांच्या रोख रकमेच्या अनुषंगाने व्यापार विकास गोल्ड लोन त्याच्या दैनंदिन परतफेडीच्या पर्यायामुळे वेगळे ठरते. यात व्यापाऱ्यांना फक्त दिवस आणि वापरलेल्या रकमेसाठीच व्याज भरावे लागते. आर्थिक लवचिकता शोधणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ही आकर्षक व्याजदरासह एकत्रित कर्ज योजना उत्तम

मुथूट

पर्याय बनविते. कारण यावर कोणतेही प्रीपेमेंट शुल्क नाही आणि क्रेडिट हिस्टरीचे (CIBIL निकष)देखील नियम कठोर नाहीत. कर्जदार केवळ थकित रकमेवरच व्याज देतील, हे निश्चित करूनच कर्जावरील व्याज कमी होत असलेल्या शिलकीच्या आधारावर केले जाते. यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होतो.

मुथूट फिनकॉर्पचे सीईओ शाजी वर्गिस म्हणाले की, सूक्ष्म आणि लघु व्यवसाय चालविणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी व्यापार विकास गोल्ड लोन डिझाइन करण्यात आलेले आहे. व्यापाराचे गतिमान स्वरूप आणि रोख रक्कम व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण भूमिका आम्ही ओळखतो. दैनंदिन परतफेडीचे सोपे पर्याय, कोणतेही प्रीपेमेंट शुल्क नाही. केवळ थकबाकीसाठी आणि मिळालेल्या दिवसांसाठी व्याज, आकर्षक व्याजदर आणि डिजिटल परतफेड सुविधा यासारख्या वैशिष्ट्यांसह ही योजना व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता, सुविधा आणि आर्थिक साहाय्य देईल. देशभरातील व्यापाऱ्यांना त्यांचे व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सक्षम बनविणे, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

व्यापार विकास गोल्ड लोन मुथूट फिनकॉर्प वन मोबाइल ॲपद्वारे डिजिटल परतफेड सुलभ करते, ज्यामुळे व्यापाऱ्यांना परतफेडीसाठी शाखांना भेट देण्याची गरज नाही. शिवाय एसएमएस किंवा ॲपद्वारे 24X7 एक्स्प्रेस टॉप-अप सुविधेमुळे शाखा भेटींशिवाय व्यापारी आवश्यक तेव्हा अतिरिक्त निधी मिळवू शकतात. चोवीस तास सेवा हे वैशिष्ट्य मुथूट फिनकॉर्पच्या अखंड आणि कार्यक्षम वित्तीय सेवा देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content