Monday, December 23, 2024
Homeएनसर्कल‘झोमॅटो’पाठोपाठ ‘ग्लेनमार्क’चा आयपीओही...

‘झोमॅटो’पाठोपाठ ‘ग्लेनमार्क’चा आयपीओही ‘घबाड परंपरा’ राखेल?

झोमॅटोचा आयपीओ आज लिस्ट झाला. गुंतवणूकदारांना अपेक्षेप्रमाणे घसघशीत  सुमारे ८० टक्के इतका परतावा मिळवून देणाऱ्या झोमॅटोपाठोपाठच येत्या २७ जुलै रोजी खुली होणारी ग्लेनमार्क लाईफसायन्सेसची प्रारंभिक समभाग विक्रीही (आयपीओ) तसाच चर्चेचा विषय बनली आहे. हा आयपीओही गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून देणार असल्याची चर्चा जवळजवळ गेले वर्ष-दीडवर्ष सुरू आहे. ही चर्चा ‘आयपीओ घबाड परंपरा’ कायम राखील का, याचीच चर्चा सध्या रंगली आहे.

भारतीय औषधे निर्मिती क्षेत्रातील ख्यातकीर्त अशा ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सची ही उपकंपनी औपचारिकरित्या स्थापित होऊन अवघी अडीच वर्षे झाली असली तरी औषधे बनविण्यासाठी लागणाऱ्या मूळ औषधद्रव्यांची (एक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रिडियंटस) निर्मिती आणि संशोधन व्यवसायात ती तब्बल २० वर्षे काम करत असून देशातील तसेच परदेशातील अनेक नामवंत औषधनिर्मिती कंपन्यांना मूलभूत औषधीद्रव्ये पुरवत आहे.

गेल्या ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात तिने रु. १५३७ कोटींच्या महसुलावर रु. ३१४ कोटींचा नक्त नफा मिळविला आहे. येत्या मंगळवारी खुल्या होणाऱ्या या आयपीओत रु. १०६० कोटींचे नवे समभाग वितरित करण्यात येतील तर ६३,००००० समभाग ऑफर फॉर सेल आहेत. या आयपीओद्वारे कंपनीला रु.१५१३.६० कोटी मिळतील.

झोमॅटो

या आयपीओचा किमंत पट्टा  रु.६९५ -७२० असा असून किमान २० समभागांची आणि त्यापुढे २० समभगांच्या पटीत मागणी करावी लागेल. २९ जुलै २०२१ पर्यंत आयपीओ खुला असेल. वैयक्तिक किरकोळ गुंतवणूकदारासाठी ३५% समभाग राखून ठेवण्यात आले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान रु १४,४०० /- गुंतवून आपले नशीब आजमावता येईल.

यावर्षात प्रारंभिक समभाग विक्री केलेल्या बहुतांश कंपन्यानी गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. चालू जुलै महिन्यात आलेल्या चारपैकी चारही आयपीओनी ते सूचिबध्द होतानाच घबाड योग म्हणजे काय असतो याची झलक दाखवून दिली. चांगल्या कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीस गुंतवणूकदारांकडून अफाट प्रतिसाद लाभत असल्याने हे समभाग आपल्याला मिळतीलच याची खात्री नसते. पण नशीबाने मिळालेच तर आपला प्रचंड फायदा होतो.

शेअरबाजार हे गुंतवणुकीसाठी अत्यंत चांगले क्षेत्र आहे. पण या क्षेत्राबद्दल सर्वसामान्य लोक अत्यंत पूर्वग्रहदूषित असतात. शेअरबाजार म्हणजे सट्टा बाजार नव्हे तर अभ्यासू वृत्तीने आणि शिस्तबध्दतेने संपत्ती निर्मिती करण्याचा तो एक मार्ग आहे. आयपीओतील गुंतवणुकीद्वारे आपणही हा मार्ग अनसुरू शकतो.

ग्लेनमार्क लाईफसायन्सेसचा आयपीओ निश्चितच आकर्षक आहे. सूचीबध्द होतानाच म्हणजे ६ ऑगस्टलाच प्रतिसमभागावर सुमारे २९५ ते ३०० रपयांचा फायदा होईल, अशी ग्रे मार्केटमध्ये हवा असल्याचे बोलले जाते. पण त्यावर भाळून न जाता आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊन मगच आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय घेणे केव्हाही चांगले!

Continue reading

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार असलेला त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प येत्या मंगळवारी संसदेत सादर होणार आहे. आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी आंध्र प्रदेश आणि बिहार राज्यांना विशेष मदत दिली जाईल का तसेच पुढील...

निर्मला सीतारामन आज सर्वसामान्यांना दिलासा देणार?

अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत आज सादर होणाऱ्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे समस्त देशवासियांचे डोळे लागले आहेत. पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने यंदाच्या पूर्ण अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्यांना निश्चितच काही दिलासा देतील, अशी अनेकांची अटकळ आहे. त्यातही, मीही मध्यमवर्गीयच...
Skip to content