Homeकल्चर +'धर्मवीर - २'...

‘धर्मवीर – २’ येत्या २७ सप्टेंबरला जगभरात!

महाराष्ट्रातली पूरपरिस्थिती व मुसळधार, अतिमुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या ‘धर्मवीर – २’, हा चित्रपट येत्या २७ सप्टेंबरला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. काही गावं पाण्याखाली गेली तर काही गावांचा संपर्कही तुटला होता. राज्यात सुरू असलेली ही पूरपरिस्थिती पाहून ‘धर्मवीर – २’ ह्या ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल ह्यांनी घेतला होता. ह्या अनोख्या निर्णयाचे सगळीकडे विशेष कौतुकही करण्यात आले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून अजून दीड महिन्यांचा अवधी घेऊन येत्या २७ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यावर चित्रपटगृहांकडून विचारणा होत होती. अनेक ग्रुप बुकिंगसाठी थांबलेले होते. परदेशातून प्रदर्शनासाठी विचारणा होत होती. सोशल मीडियावरही चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याची विचारणा अनेकजण करत होते. आता प्रेक्षकांना चित्रपटासाठी केवळ २७ सप्टेंबरपर्यंत वाट पाहवी लागणार आहे.

Continue reading

व्हाईट लोटस हॉस्पिटलतर्फे रविवारी मोफत तपासण्या शिबीर

सणासुदीच्या मोसमाच्या निमित्ताने नवी मुंबईत आरोग्यविषयक सर्वात मोठी तसेच व्यापक मोहीम सुरू करताना कळंबोली येथील व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे येत्या रविवारी, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विविध स्वरूपाच्या मोफत तपासणी शिबिराचे...

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...
Skip to content