Homeमुंबई स्पेशलमुंबई शहराची प्रारूप...

मुंबई शहराची प्रारूप मतदारयादी २५ जुलैला होणार प्रसिद्ध

मतदारयादी अद्ययावत तसेच अचूक होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पुनरीक्षण उपक्रमांतर्गत एकत्रिकृत प्रारूप मतदारयादी येत्या २५ जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येत्या २७ व २८ जुलैला तसेच ३ व ४ ऑगस्टला मुंबई शहर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम मोहीम राबविण्यात येणार आहे. या दिवशी सर्व बीएलओ सर्व मतदान केंद्रांवर उपस्थित राहणार आहेत. मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज जिल्हाधिकारी यादव यांच्या अध्यक्षतेखाली मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत काल बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

छायाचित्रासह मतदारयादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारयादीत नाव नसलेले नावनोंदणी करु शकतात, नावांमधील दुरुस्ती करून घेऊ शकतात तसेच नाव स्थलांतरित करुन घेऊ शकतात. ही सर्व कामे ऑनलाईन पद्धतीनेही करता येतील. यासाठी बीएलओंमार्फत गृहभेटी कार्यक्रमही आखण्यात आला आहे. पुनरीक्षण मोहीम कालावधीत नवीन मतदारांची नावनोंदणी करणे, मयत मतदारांचे, स्थलांतरीत मतदाराचे नाव वगळणे आदी कार्यक्रम राबविले जातील, असे ते म्हणाले.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, पुनर्रचना, मतदारयादीमधील तफावत दूर करणे, अस्पष्ट, निकृष्ट दर्जाचे फोटो बदलून चांगल्या प्रतीचे फोटो सुनिश्चित करणे, मतदारयादीमधील विनिर्देशन आणि मानवेतर प्रतिमा, जेथे आवश्यक असेल तेथे बदल करणे. विभागांची पुनर्रचना करणे आणि विभाग सीमांच्या प्रस्तावित पुनर्रचनेस अंतिम रुप देणे, त्यानंतर मतदान केंद्रांच्या यादीची मान्यता घेणे. कंट्रोल चार्ट अद्ययावतीकरण करणे, नमुना एक ते आठ तयार करणे आदी गोष्टी केल्या जाणार आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मतदारयादी

 या बैठकीत मतदारनोंदणी वाढवणे आणि जनजागृती करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी विविध जनजागृती कार्यक्रमात सहभाग घ्यावा. तसेच मतदारनोंदणी न केलेल्या सर्व पात्र नागरिकांनी मतदारनोंदणी करावी, जिल्ह्यात १८ ते १९ वर्षे वयोगटातील युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयात मतदारनोंदणीसाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदारयादीत ऑनलाईन नावनोंदणीसाठी किंवा तपशीलात बदल करण्यासाठी https://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला किंवा वोटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपला भेट द्यावी,असे आवाहनही जिल्हाधिकारी यादव यांनी केले.

या बैठकीस स्वीपच्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)  श्यामसुंदर सुरवसे, संबंधित उपजिल्हाधिकारी तसेच कामगार, सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content