Homeबॅक पेजअर्पित पांडेने जिंकली...

अर्पित पांडेने जिंकली मंगला अडसूळ स्मृती बुद्धिबळ स्पर्धा     

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त आयोजित मंगला अडसूळ स्मृती चषक खुली जलद बुद्धीबळ स्पर्धा फिडे गुणांकित बुद्धिबळपटू अर्पित पांडेने जिंकली. सातव्या साखळी फेरीपर्यंत सर्व सामने जिंकणाऱ्या अर्पितने निर्णायक आठव्या फेरीमध्ये सावध खेळ करीत रचित गुरनानीविरूद्ध २८व्या मिनिटाला बरोबरी साधली आणि सर्वाधिक ७.५ साखळी गुणांसह अजिंक्यपदाला गवसणी घातली.

विजेत्या अर्पित पांडेला रुपये दहा हजार पुरस्कारासह विजेतेपदाचा मंगला अडसूळ स्मृती चषक देऊन माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांनी गौरविले. यावेळी को-ऑप. बँक एम्पलॉईज युनियनचे कार्याध्यक्ष विष्णू तांडेल व खजिनदार प्रमोद पार्टे, मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती.

को-ऑप. बँक एम्पलॉईज युनियन-मुंबई, आरएमएमएस व मुंबई बुद्धिबळ संघटना सहकार्यीत स्पर्धेमध्ये रुपये सहा हजारसह द्वितीय पुरस्कार फिडे गुणांकित बुद्धिबळपटू रचित गुरनानीने (६.५ गुण) पटकाविला. १५ वर्षीय अरेना कॅन्डिडेट मास्टर अरविंद अय्यरने (६.५ गुण) तृतीय, फिडे मास्टर मिथिल आजगावकरने (६.५ गुण) चौथा, १८ वर्षीय फिडे मास्टर अनिरुद्ध पोतवाडने (६ गुण) पाचवा, अनिकेत बापटने (६ गुण) सहावा, वंश अग्रवालने (६ गुण) सातवा, जीत शाहने (६ गुण) आठवा, गुरुप्रसाद कुळकर्णीने (६ गुण) नववा, सोहम पवारने (६ गुण) दहावा, योहान बोरीचाने (६ गुण) अकरावा तर फिडे मास्टर वेदांत नगरकट्टेने (५,५ गुण) बारावा पुरस्कार मिळविला.

स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सातारा आदी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ५१ बुद्धिबळपटूसह १०४ खेळाडूंनी चुरशीच्या लढती दिल्या. को-ऑप. बँक एम्पलॉईज युनियन-मुंबईतर्फे एकूण रु. ४१,००० /- आणि आकर्षक ७५ चषकांचा पुरस्कार शालेय व खुल्या स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांना देण्यात आला.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content