Homeडेली पल्समंगला अडसूळ स्मृती...

मंगला अडसूळ स्मृती बुद्धीबळ स्पर्धेला सुरूवात

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिनानिमित्त सुरू झालेल्या मंगला अडसूळ स्मृती चषक ८/१०/१२ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या बुद्धीबळ स्पर्धेत आरव जतानिया, समीर नाडकर्णी, अनंत काब्रा, आस्य चव्हाण, खुश मोकारीया, मल्हार कोटे आदींनी विजयी दौड केली.

मुंबई बुद्धीबळ असोसिएशन मान्यतेच्या स्पर्धेत मुंबई शहर-उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील ६४ सबज्युनियर खेळाडूंमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन को-ऑपरेटीव्ह बँक एम्पलॉईज युनियन-मुंबईचे अध्यक्ष व माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते झाले.

मंगला अडसूळ स्मृती ८ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत आरव जतानियाने मितांश टोलीयाच्या राजाला १६व्या चालीअखेर नमविले. समीर नाडकर्णीने अक्षय काब्राला तर अनंत काब्राने समीर थोरातला पराभूत केले. १२ वर्षांखालील गटात आस्य चव्हाणने जश मोकारीयावर, खुश मोकारीयाने अब्दुल हादीवर तर मल्हार कोटेने आदित्य पालकरवर विजय मिळवून सलामीचा पहिला साखळी गुण वसूल केला.

उदघाटनप्रसंगी को-ऑप. बँक एम्पलॉईज युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, हशम धामस्कर, प्रकाश वाघमारे, भार्गव धारगळकर, जनार्दन मोरे, अशोक नवले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content