टी-ट्वेण्टीचा वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतलेल्या रोहित शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय क्रिकेट टीमने आज मुंबईत मरीन ड्राइव्हवर खुल्या बसमधून विजयी परेड काढली. या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी, त्यांचे स्वागत करण्याकरीता मुंबईकरांनी मरीन ड्राइव्हवर तुफान गर्दी केली होती. भर

पावसातही हा जनसागर जमला होता. त्यात अनेक उत्साही चाहत्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पावसातही रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर चढून आपली जागा निश्चित केली आणि ‘टीम इंडिया’तल्या खेळाडूंना दाद दिली. त्याची ही बोलकी छायाचित्रे…
