Homeमुंबई स्पेशलआज संध्याकाळी मरीन...

आज संध्याकाळी मरीन ड्राइव्हवर घ्या पाइप बँडचा आनंद

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने भारतीय लष्कराच्या मुंबईतल्या मुख्यालयांतर्गत (महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात विभाग) १५ आसाम रेजिमेंटच्या पाइप बँड पथकाकडून आज शनिवारी सायंकाळी ६ वाजता मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह येथे किलाचंद चौक (हॉटेल मरीन प्लाझासमोर) येथे सामरिक धून (मार्शल ट्यून) वादन होणार आहे.

भारतीय लष्कराच्या शिस्त आणि शौर्यासोबतच लष्करी वाद्यवृंदाची ओळख नागरिकांना व्हावी. लष्करी वाद्यसंगीताची अनुभूती नागरिकांना घेता यावी, या उद्देशाने भारतीय लष्कर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पाइप बँड पथकाकडून सामरिक धून वादनाचे कार्यक्रम मुंबई महानगरात विविध ठिकाणी आयोजित केले जात आहेत. यापूर्वी पालिका मुख्यालयासमोरील सेल्फी पॉईंट, भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) आणि स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे पाइप बँड पथकाने सामरिक धून सादर केली होती. त्यास मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.

नागरिकांकडून मिळणारा हा प्रतिसाद पाहून आज सायंकाळी ६.०० ते ८.०० वाजेदरम्यान किलाचंद चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लष्करी वाद्यवृंदाच्या सादरीकरणाची अनुभूती घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

लष्करी पाइप बँडची देदिप्यमान परंपरा

भारतीय लष्कराच्या १५ आसाम रेजिमेंटच्या पाइप बँड पथकाची स्थापना १५ जुलै १९८७ रोजी मेघालयाची राजधानी शिलाँग येथे झाली. हा पाइप बँड उत्कृष्टता आणि सन्मानाचे प्रतीक मानला जातो. यापूर्वी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत मिळून या बँडने विविध ठिकाणी सादरीकरण केले आहे. त्यामध्ये मुंबईतील राजभवन, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए), षण्मुखानंद सभागृह, महालक्ष्मी रेसकोर्स आदी ठिकाणांचा समावेश आहे. मुंबईकरांनाही या बँडच्या सादरीकरणाची अनुभूती घेता यावी, यासाठी यंदा प्रथमच भारतीय लष्कर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरात विविध ठिकाणी सादरीकरण केले जात आहे. सुमारे २० सदस्यांचा समावेश असलेल्या पथकाद्वारे गौरवशाली आणि सुमधुर रचना सादर केल्या जातात. यात प्रामुख्याने पाइप आणि ड्रम या दोन वाद्यांचा समावेश असतो. 

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content