महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2024मधील दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षांना शनिवार, 22 जून 2024पासून प्रारंभ होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील सुमारे 82,267 विद्यार्थी बसणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या विविध पदवी, पदव्यूत्तर व विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा राज्यातील एकूण 207 परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. या परीक्षेत बी.डी.एस, बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी.एच.एम.एस. उर्वरित पदवी अभ्यासक्रमाच्या तसेच बी.एस्सी. नर्सिंग, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग, पी.बी. बी.एस्सी. नर्सिंग, बी.पी.टी.एच. बी.ओ.टी.एच. बी.पी.ओ. बी.ए.एस.एल.पी., उर्वरित पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एम.डी.एस., डिप्लोमा डेन्टींस्ट्री, एम.डी.-एम.एस. आयुर्वेद अॅण्ड युनानी, डिप्लोमा आयुर्वेद, एम.डी. होमिओपॅथी, एम.ओ.टी.एच., एम.एस्सी. नर्सिंग, एम.पी.टी.एच., एम.पी.टी., एम.ए.एस.एल.पी., एम.एस्सी. (ऑडिओलॉजी), एम.एस्सी., (एस.एल.पी.), एम.पी.ओ. परीक्षा घेण्यात येणार आहेत.
विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमात एम.पी.एच., एम.पी.एच (एन), एम.बी.ए., एम. फिल., बी. ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, / ऑप्थॉलमिक, डिप्लोमा पॅरामेडिकल, सी.सी.एम.पी., एम.एम.एस.पी.सी., पी.जी. डि.एम.एल.टी., बी.पी.एम.टी., एम.एस्सी. फार्मास्युटिकल अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाचे www.muhs.ac.in अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.