केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने काल लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज सी. पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जनरल पांडे 31 मेऐवजी 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त होतील.
सरकारने लष्करी नियम 1954 च्या नियम 16 अ (4) अंतर्गत पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी यांच्या सेवेत त्यांच्या सामान्य सेवानिवृत्ती वयापेक्षा (31 मे 2024) एक महिन्याच्या अधिक कालावधीसाठी म्हणजे 30 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. त्यांची 30 एप्रिल 2022 रोजी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. डिसेंबर 1982मध्ये त्यांची अभियांत्रिकी लष्करी तुकडीत (द बॉम्बे सॅपर्स) नियुक्ती झाली होती. लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून कामकाज पाहिले होते.